मुंबई

कर्करोगावरील १७ औषधी होणार स्वस्त

CD

कर्करोगावरील १७ औषधी होणार स्वस्त
१७ औषधांवरील आयात शुक्ल कमी; रुग्णांना दिलासा


सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ : केंद्रीय अर्थसंकल्पात कर्करोगाने त्रस्त असणाऱ्या रुग्णांना दिलासा मिळाला आहे. केंद्र सरकारने आरोग्य क्षेत्रासाठी पहिल्यांदाच एक लाख कोटी रुपयांपेक्षा अधिकची तरतूद केली आहे. ही वाढ गेल्या काही वर्षांमध्ये सर्वात जास्त आहे. तसेच अर्थसंकल्पात एकूण १७ औषधांवरील अतिरिक्त आयात शुल्कावर सूट देण्याचे सरकारने घोषित केले आहे. त्यामुळे कर्करोग रुग्णांवरील औषधांचा भार कमी होण्यास मदत होणार आहे.

कर्करोगावर उपचारांसाठी रिबोसिक्लिब, एबेमॅसिक्लिब, टॅलीकाबटेजीन ऑटोल्यूसेल, ट्रेमेलिम्युमॅब, व्हेनेटोक्लॅक्स, सेरिटिनिब, ब्रिगाटिनिब, डारोलुटॅमाइड, टोरिपॅलिमॅब, सेरप्लुलिमॅब, टिस्लेलिझुमॅब, इनोतुझुमॅब ओझोगॅमिसिन, पोनाटिनिब, इब्रुटिनिब, डाब्राफेनिब, ट्रामेटिनिब, इपिलिमुमॅब या महत्त्वाच्या १७ औषधांना आयात शुल्कामधून सूट देण्यात आली आहे. दुसरीकडे महिलांमधील स्तन कर्करोगाच्या उपचारांसाठी लागणारी रिबोसिक्लिब, एबेमॅसिक्लिब किंवा रक्ताच्या कर्करोगासाठी आधुनिक व्हेनेटोक्लॅक्ससारखी औषधे आजच्या निर्णयामुळे स्वस्त होतील.


महिन्याला ४० हजारांचा खर्च
कर्करोगावरील सर्व औषधांवरील आयात शुल्क पूर्णपणे माफ केले पाहिजे. कारण महिन्याला ४० हजार रुपये खर्च येतो. उपचारांसाठीच्या योजनांमध्येही गोंधळ आहे. माझ्यावर स्तन कर्करोगाची शस्त्रक्रिया झाली आहे. २०१६ पासून आजअखेर गेली नऊ वर्षे कर्करोगासंबंधित सर्व पाठपुरावा केला जात आहे. कर्करोगावरील औषधे आणि उपचारांचा खर्च परवडणारा नाही.
- गीतांजली नांगरे, कर्करोग रुग्ण


कर्करोगावरील उपचारांसाठी सुमारे दोन ते २५ लाख एवढा खर्च येतो. अत्याधुनिक इम्युनोथेरपी व केंद्रित थेरपीसाठी ५० लाख ते एक कोटी इतका खर्च येतो. अर्थसंकल्पात १७ औषधांवरील आयात शुक्ल कमी केले असले तरी नेमके किती कमी होणार, हे स्पष्ट झालेले नाही; तरीही हा निर्णय रुग्णांच्या हिताचा आहे.
- डॉ. दिलीप निकम, कर्करोगतज्ज्ञ, बॉम्बे रुग्णालय


१७ महत्त्वाच्या कर्करोग औषधांवरील आयात शुल्क माफ करण्यात आले असून, वैयक्तिक वैद्यकीय वापरासाठी आयात शुल्कातून सूट मिळालेल्या दुर्मिळ आजारांच्या यादीत सात अतिरिक्त आजारांचा समावेश करण्यात आला आहे. भारतात दरवर्षी १४ लाखांहून अधिक नवीन कर्करोग रुग्ण आढळतात. अंदाजानुसार भारतातील कर्करोगाचे प्रमाण वाढून २०४० पर्यंत ते सुमारे २० लाख प्रकरणांपर्यंत पोहोचू शकते.
- डॉ. आशीष जोशी, वैद्यकीय ऑन्कोलॉजिस्ट


बायोफार्मा शक्ती कार्यक्रमासाठी १० हजार कोटी रुपयांची तरतूद ही भारताच्या औषधनिर्माण क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. आधुनिक संशोधन, नवी तंत्रज्ञान व्यवस्था आणि जागतिक दर्जाच्या उपचार पद्धती विकसित होण्यास यामुळे चालना मिळेल.
- डॉ. रॉय पाटणकर, संचालक, झेन मल्टिस्पेशालिटी रुग्णालय


सध्या देशात मधुमेह, कर्करोग तसेच वयोमानानुसार होणाऱ्या आजारांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. हा कार्यक्रम अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी सार्वजनिक व खासगी क्षेत्रात भागीदारी आवश्यक आहे. नावीन्यपूर्ण संशोधन, व्यापक अंमलबजावणी आणि रुग्णसेवा यांचा समन्वय साधल्यास या योजनेचा मुख्य फायदा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचू शकतो.
- रेनी वर्गीस, मुख्य परिचालन अधिकारी, झायनोबा शाल्बी रुग्णालय


कर्करोग व दुर्मिळ आजारांसाठी वापरल्या जाणाऱ्या अनेक आयातीत औषधांवरील सीमा शुल्क सवलती वाढवण्यात आल्या असून, १७ महत्त्वाच्या कर्करोग औषधांना व काही दुर्मिळ आजारांच्या औषधांना शुल्क सवलत देऊन रुग्णांचा खर्च कमी करण्याचा प्रयत्न आहे.
- डॉ. अविनाश सुपे, माजी अधिष्ठाता, केईएम रुग्णालय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT