मुंबई

अस्मिता विद्यालयाचे वर्चस्व कायम

CD

अस्मिता विद्यालयाचे वर्चस्व कायम
जोगेश्‍वरीतील आंतरशालेय मिनी मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद

जोगेश्‍वरी, ता. १ (बातमीदार) : संजय स्पोर्ट्स अकॅडमी व मुंबई ॲमॅचर ॲथलेटिक्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या आंतरशालेय मिनी मॅरेथॉन स्पर्धेला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. रविवारी सकाळी झालेल्या या स्पर्धेत जोगेश्वरी परिसरातील १८ शाळांमधील सुमारे १,४०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. अस्मिता विद्यालयाने सलग चौथ्या वर्षी चॅम्पियन ट्रॉफी पटकावून आपले वर्चस्व कायम राखले.
स्पर्धा रोड रेस (एकात्मता दौड) स्वरूपाची असून, विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा संस्कृती रुजवणे, शारीरिक तंदुरुस्ती वाढवणे व सामाजिक सलोखा जोपासणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. विद्यार्थ्यांच्या वयोगटानुसार स्पर्धेसाठी तीन मॅरेथॉन मार्ग निश्चित करण्यात आले होते. इयत्ता आठवी ते दहावीच्या मुला-मुलींसाठी तीन किमी, इयत्ता पाचवी ते सातवीच्या मुला-मुलींसाठी दोन किमी, तर लहान गटासाठी एक किमी मॅरेथॉन घेण्यात आली. सर्व मार्गांची सुरुवात व समाप्ती इस्माईल युसूफ कॉलेज गेट क्रमांक २ येथे होती. स्पर्धा मॅरेथॉन धावपटू व आयोजक संजय चिंदरकर यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडली.

फोटो - 234

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Crisis: इराण-इस्रायल युद्धाचा महाराष्ट्रात परिणाम! महायुती सरकारने घेतला मोठा निर्णय; आता LPG पुरवठ्यावर नजर राहणार

लखनौचा कायापालट! ४५ मिनिटांचा प्रवास आता फक्त १५ मिनिटांत; पाहा योगींचा 'ग्रीन' प्लॅन!

PM Kisan : शेतकऱ्यांच्या खात्यात पुन्हा आले २ हजार रुपये! PM मोदींनी जारी केला २२ वा हप्ता; यूपीच्या शेतकऱ्यांवर पैशांचा पाऊस!

March Ending: 31 मार्चपूर्वी करा हे काम! नाहीतर PF आणि पेन्शन खाते होऊ शकते निष्क्रिय; करसवलतीचा लाभही मिळणार नाही

Ayodhya Ram Mandir : काय आहे राम मंदिरात बसवले जाणारे 'श्री राम यंत्र'? राष्ट्रपतींच्या उपस्थितीत होणार भव्य सोहळा!

SCROLL FOR NEXT