खालापुरात अजित पवार यांना सर्वपक्षीय श्रद्धांजली
खालापूर (बातमीदार) ः उपमुख्यमंत्री अजित पवार यांना रविवारी (ता. १) सर्वपक्षीयांच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. या वेळी उपस्थितांनी अजित पवारांच्या आठवणी जागवल्या. माजी नगराध्यक्षा शिवानी जंगम यांनी पार्थ पवार खासदारकीला उभे असताना अजितदादांचा राजकीय सहवास लाभला होता, त्या वेळी त्यांची कामाची पद्धत आणि वेळेचे महत्त्व हे गुण कायम लक्षात राहतील, असे सांगितले. ठाकरे गटाचे नेते उमेश गावंड यांनी श्रद्धांजली अर्पण करताना अजित पवार यांच्या निधनाने सर्व महाराष्ट्र हळहळला असून महाराष्ट्राचे कधीही न भरून येणारे नुकसान झाल्याची भावना व्यक्त केली. ग्रामीण भागातील समस्येची जाण असलेला आणि प्रशासनावर पकड असलेला एकमेव नेता गमावल्याचे खालापुरातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नवीनचंद्र घाटवळ यांनी श्रद्धांजली कार्यक्रमात सांगितले.
श्रद्धांजली कार्यक्रमासाठी नगर पंचायतीच्या नगराध्यक्षा रोशना मोडवे, उपनगरध्यक्ष संतोष जंगम, नगरसेवक राजेश पारठे, किशोर पवार, नगरसेविका श्वेता गुरव, सामाजिक कार्यकर्ते मामा भोईर, संतोष गुरव, वैभव भोईर, रोशन खराळ, पद्माकर पाटील, कैलास वाडेकर, संभाजी पाटील, पुंडलिक लोते, महेश राठी, माजी सरपंच अनिल चाळके, माजी नगरसेवक राहुल चव्हाण, नितीन पाटील, उमेश पडवकर, अमित जगताप, राकेश गव्हाणकर, कौस्तुभ जोशी, नरेश मोडवे, पांडुरंग मगर, मंगेश चाळके, दिपक पाटील, रवींद्र सोनावणे, संगीता घाटवळ, हेमलता चिंबुळकर, यांच्यासह सर्वच क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.