मुंबई

ठाण्यात साडेतीन लाखांचे सोन्याचे दागिने चोरीला

CD

ठाण्यात साडेतीन लाखांचे सोन्याचे दागिने चोरीला

ठाणे, ता. १ (बातमीदार) : घरातील काही साहित्य गावी पाठविण्याच्या तयारीदरम्यान बेडरूममधील लोखंडी कपाटात ठेवलेले अंदाजे साडेतीन लाखांचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची बाब समोर आली. त्यामध्ये २९.१२० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, कानातले, अंगठी, वाटी-मणी व नथ यांचा समावेश असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
दिवा पूर्व येथील धनराज रेसिडन्सीत राहणाऱ्या मेधा अनंत जाधव (वय ३४) यांच्या घरी ही चोरी झाली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या मागील १० वर्षांपासून त्यांचा पती सुशील जाधव (३६) यांच्यासह येथे राहतात. त्या लालबाग येथील मास्टरगार्ड फोर्स या सिक्युरिटी कंपनीत नोकरी करतात. गुरुवारी (ता. २७) दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घरातील काही साहित्य गावी पाठविण्याच्या तयारीदरम्यान बेडरूममधील लोखंडी कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने दिसून आले नाही. त्यानंतर घरात सर्वत्र शोध घेतला. ते दागिने त्यांनी शेवटचे १८ ऑक्टोबर २०२५ला पाहिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. घरगुती साहित्य शिफ्टिंगदरम्यान दागिने कुठेतरी ठेवले गेले असावेत, या समजुतीने बराच काळ शोध घेतला गेला; मात्र दागिने सापडले नाहीत. अखेर त्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्यामध्ये अनोळखी चोरट्याने उघड्या दरवाजावाटे घरात प्रवेश करून बेडरूममधील लोखंडी कपाटाच्या लॉकरमधून सुमारे तीन लाख ३३ हजार ७०० रुपयांचे सोन्याचे दागिने चोरी केल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी मुंब्रा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास मुंब्रा पोलिस करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US reduces tariff for India : मोठी बातमी! अमेरिकेने भारतावरील टॅरीफ कमी केला; ट्रम्प यांची घोषणा

Apple Valentine Offer : ‘अ‍ॅपल’ने लाँच केली ‘व्हॅलेंटाईन डे’ स्पेशल फेस्टिव्ह कॅशबॅक ऑफर!

Rohit Shetty Firing Case : रोहित शेट्टीच्या घरावर गोळी झाडणारा अकोल्याचा; बिश्नोई टोळीच्या शुभम लोणकरने सोशल मीडियावर स्वीकारली जबाबदारी

Mohol Leopard News : मोहोळ शहरा नजीक आढळलेले बिबट्या सदृश्य प्राणी हे बिबटे नसून मार्जर कुळातील रान मांजर वनविभागाचा निर्वाळा

Social Media Impact : सोशल मीडियावर अर्ध-नग्नता; समाजाच्या मानसिक आरोग्यावर परिणाम काय असू शकतो?

SCROLL FOR NEXT