मुंबई

प्रीमियर ५ ''मराठी शाळा योजना’ सुरू

CD

प्रीमियर

‘क्रांतिज्योती विद्यालय...’ची
‘मराठी शाळा योजना’ सुरू
मराठी शाळांचे सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक महत्त्व प्रभावीपणे मांडणारा ‘क्रांतिज्योती विद्यालय - मराठी माध्यम’ हा चित्रपट सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेला आहे. प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या चार आठवड्यांत या चित्रपटाने २४.०३ कोटींची कमाई करत उल्लेखनीय यश मिळवले आहे. या यशाच्या पार्श्वभूमीवर चित्रपटाच्या निर्मात्यांनी आता मराठी शाळांसाठी एक विशेष उपक्रम सुरू केला आहे. ‘मराठी शाळा योजना’ असे या उपक्रमाचे नाव असून, त्याअंतर्गत मराठी माध्यमाच्या शाळा, विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी सवलतीच्या दरात विशेष चित्रपट शो आयोजित केले जाणार आहेत. विद्यार्थ्यांना मराठी माध्यमाची ओळख, त्याची संस्कृती आणि शाळेशी असलेले भावनिक नाते अधिक दृढ व्हावे, हा या उपक्रमामागचा उद्देश आहे. या योजनेंतर्गत अनेक मराठी शाळा, माजी विद्यार्थी संघटना आणि सेवाभावी संस्था पुढाकार घेत असल्याचे चित्र दिसत आहे. या उपक्रमाबाबत दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणाला, “प्रेक्षकांनी दिलेले प्रेम आमच्यासाठी महत्त्वाचे आहेच, पण मराठी शाळांमधील विद्यार्थी आणि शिक्षक या चित्रपटाशी स्वतःला जोडताना पाहणे हे अधिक समाधान देणारे आहे.” या चित्रपटात सचिन खेडेकर मुख्याध्यापकाच्या भूमिकेत असून, अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर, क्षिती जोग, कादंबरी कदम, हरीश दुधाडे, पुष्कराज चिरपुटकर, निर्मिती सावंत आणि प्राजक्ता कोळी अशी कलाकारांची मोठी फळी आहे. हेमंत ढोमेने चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन केले असून, क्षिती जोग यांची निर्मिती आहे. विराज गवस, उर्फी काझमी आणि अजिंक्य ढमाळ सहनिर्माते आहेत.
......
राम चरणला जुळे अपत्य
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता राम चरणच्या कुटुंबात आनंदाची बातमी पसरली आहे. राम चरणला एक मुलगा आणि एका मुलगी असे जुळे अपत्य झाले. ही माहिती मेगास्टार चिरंजीवी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली असून, राम चरणची पत्नी उपासना आणि दोन्ही बाळे प्रकृतीने ठणठणीत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. या आनंदाच्या क्षणी राम चरण यांनी भावना व्यक्त करत सांगितलं, “दोन अपत्यांचा पिता होणं ही माझ्यासाठी कृतज्ञतेची भावना आहे. आमच्यावर प्रेम करणाऱ्या चाहत्यांचे, कुटुंबीयांचे आणि शुभेच्छुकांचे मनापासून आभार.” राम चरण आणि उपासना यांना २०२३ मध्ये पहिली मुलगी झाली होती.
......
करण जोहरच्या भयपटात आदित्य रॉय कपूर?
हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीचा निर्माता-दिग्दर्शक करण जोहर आता नव्या वाटेवर पाऊल टाकताना दिसत आहे. रोमँटिक, कौटुंबिक आणि भव्य व्यावसायिक चित्रपटांसाठी ओळखला जाणारा करण आता लवकरच थरारक भयपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची चर्चा रंगली आहे. या आगामी प्रोजेक्टसाठी अभिनेता आदित्य रॉय कपूरची निवड करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धर्मा प्रॉडक्शन्सच्या बॅनरखाली तयार होणाऱ्या या भयपट थ्रिलरचे सध्या कास्टिंग सुरू आहे. आदित्य रॉय कपूरने पटकथा वाचल्यानंतर या चित्रपटासाठी होकार दिल्याचं सांगितलं जात आहे. हा प्रोजेक्ट वेगळ्या धाटणीचा असून, चित्रपटगृहांमध्ये या भटपटाला चांगला प्रतिसाद मिळेल, असा विश्वास करणने व्यक्त केला आहे. मेपासून चित्रीकरण सुरू होण्याची शक्यता आहे. अभिनेत्री म्हणून कोण झळकणार आणि दिग्दर्शन कोण करणार, याबाबत सध्या गोपनीयता राखण्यात आली आहे. भयपटाच्या माध्यमातून करण जोहर आणि आदित्य रॉय कपूर ही जोडी प्रेक्षकांना कशा प्रकारचा अनुभव देणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे.
......
सनी देओलच्या ‘घातक’चा दुसरा भाग येणार?
‘बॉर्डर २’च्या घवघवीत यशानंतर अभिनेता सनी देओल सध्या हिमाचल प्रदेशातील मनाली येथे विश्रांती घेत आहे. या यशाच्या पार्श्वभूमीवर चित्रपटसृष्टीत एक नवी चर्चा रंगू लागली असून, सनी देओल आणि दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांची लोकप्रिय जोडी पुन्हा एकत्र येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, राजकुमार संतोषी ‘घातक’ या १९९६ मधील गाजलेल्या चित्रपटाचा पुढचा भाग सनी देओलसमोर मांडणार आहेत. तो सनीला आवडल्यास प्रकल्प पुढे जाण्याची शक्यता आहे. यासाठीच संतोषी मनाली येथे सनीची भेट घेणार असल्याचं सांगितलं जात आहे. सनी देओल आणि राजकुमार संतोषी यांनी याआधी ‘घायल’, ‘दामिनी’ आणि ‘घातक’ यांसारखे लक्षात राहणारे यशस्वी चित्रपट दिले आहेत. विशेष म्हणजे, सनी देओलच्या आगामी ‘लाहोर १९४७’ या चित्रपटाचे दिग्दर्शनही राजकुमार संतोषी यांनी केले असून, त्याची निर्मिती आमिर खान करत आहे.
.......
कोकणच्या पार्श्वभूमीवर साकारणार ‘साकव’
मराठी मनोरंजनविश्वात वेबसीरिज या माध्यमाचं महत्त्व दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. दर्जेदार कथानक, वास्तववादी मांडणी आणि नव्या विषयांमुळे प्रेक्षकांचा कल वेबसीरिजकडे वळला आहे. अशातच एक नवी वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीस येण्यासाठी सज्ज झाली आहे. कोकणच्या पार्श्वभूमीवर आधारित या वेबसीरिजचं नाव आहे ‘साकव’. नावाप्रमाणेच नात्यांना आणि माणसांना जोडणारा दुवा ही या सीरिजची मध्यवर्ती संकल्पना आहे आणि हीच भावना या सीरिजमधून अधोरेखित होणार आहे. कोकणची उबदार माती, माणसांमधली नाती, भावनिक गुंतवणूक आणि स्थानिक संस्कृती या सगळ्यांचा सुंदर संगम या कथेत पाहायला मिळणार आहे. शौरिंद्र नाथ दत्ता आणि ‘मीडिया वन सोल्युशन्स’ यांच्या निर्मितीत ही वेबसीरिज तयार होत आहे. या प्रोजेक्टच्या क्रिएटिव्ह हेड म्हणून अंकिता अशोक प्रतिभा लोखंडे काम पाहत आहेत. दिग्दर्शनाची जबाबदारी नितीन वाडेवाले यांनी सांभाळली असून, लेखन नितीन पवार यांचं आहे.
------
‘मर्दानी ३’चा बॉक्स ऑफिसवर बोलबाला!
राणी मुखर्जी पुन्हा एकदा दमदार भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. तिच्या लोकप्रिय मर्दानी फ्रँचायझीचा तिसरा भाग ‘मर्दानी ३’ नुकताच प्रदर्शित झाला असून, बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी चित्रपटाने ठोस सुरुवात केली आहे. सामाजिक विषय, ताकदवान महिला पोलिस अधिकारी आणि राणीचा ठाम अभिनय ही या चित्रपट मालिकेची ओळख राहिली आहे. या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी तब्बल चार कोटी रुपयांची कमाई केली आहे. या फ्रँचायझीतील पहिल्याच दिवशी सर्वाधिक कमाई करणारा हा भाग ठरला. सनी देओलच्या ‘बॉर्डर २’सारख्या मोठ्या चित्रपटाशी स्पर्धा असूनही ‘मर्दानी ३’ने आपली छाप सोडली आहे. शिवानी शिवाजी रॉयच्या भूमिकेबद्दल बोलताना राणीने पुन्हा एकदा पोलिस गणवेश घालणं ही सन्मानाची बाब असल्याचं सांगितलं. दिग्दर्शक अभिराज मिनावाला आणि निर्माता आदित्य चोप्रा यांनी या वेळीही गंभीर सामाजिक वास्तवावर भाष्य केलं आहे. भक्कम सुरुवातीमुळे ‘मर्दानी ३’कडून पुढील दिवसांतही चांगल्या कमाईची अपेक्षा आहे.
----
राही बर्वे यांनी सांगितली ‘मयसभा’मागची कहाणी
‘तुम्बाड’नंतर दिग्दर्शक राही अनिल बर्वे यांचा ‘मयसभा’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटात जावेद जाफरी प्रमुख भूमिकेत आहेत. चित्रपटाला संमिश्र प्रतिक्रिया मिळत असल्या तरी, या चित्रपटाच्या निर्मितीमागची प्रेरणादायी कहाणी राही बर्वे यांनी सोशल मीडियावर व्यक्त केली. राही बर्वे यांनी सांगितले की मयसभावर काम २०१८ मध्ये सुरू झाले, तेही अक्षरशः शून्य पैशांत. केवळ २३ जणांची टीम, चार कलाकार, एक जुने थिएटर, २१ दिवसांचे शूटिंग आणि हाताने लिहिलेली ९० पानांची पटकथा, अशा परिस्थितीत चित्रपट उभा राहिला. कुणालाही मानधन नव्हते. शूटिंगदरम्यान धूळ आणि धुक्यात जावेद जाफरी यांचा अस्थमाचा त्रास, टीमचा प्रचंड थकवा या सगळ्यात हा चित्रपट बनला. गिरीश आणि अंकुर यांनी लाइन प्रोड्यूसरपासून फायनान्सरपर्यंत सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळल्या. याच सेटवर राज-डीके आले आणि पुढे गुलकंदा टेल्ससारख्या मोठ्या प्रकल्पासाठी राही यांची क्षमता त्यांनी पाहिली. केवळ सात आकडी बजेटमध्ये दर्जा न घालवता चित्रपट बनू शकतो, हे मयसभाने दाखवून दिलं, असं राही म्हणाले. गुणांकनपेक्षा टीम मधील सहकार्य, विश्वास आणि चित्रपट बनवण्याची जिद्द महत्त्वाची असल्याचंही त्यांनी ठामपणे नमूद केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Budget 2026: अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या वाट्याला काय? मुंबई, पुणे मेट्रोसह ग्रामीण महाराष्ट्रासाठी तरतूद

Union Budget 2026 : अर्थसंकल्प २०२६ मध्ये मध्यमवर्गीयांसाठी मोठी भेट! सोलर उपकरणासह 'या' इलेक्ट्रॉनिक वस्तू होणार स्वस्त

Budget Alcohol Rate: मद्यप्रेमींना मोठा धक्का! दारूचे दर महागणार; बजेटनंतर किमती किती वाढणार? जाणून घ्या...

Kolhapur ZP Election : जिल्हा परिषद निवडणुकीत उमेदवाराकडून कृषी साहित्य वाटप, भरारी पथकाची धडक कारवाई

U19 WC, IND vs PAK: ५ बॉलमध्ये मोठा ड्रामा! वैभव सूर्यवंशीला एकाच बॉलवर दोनदा जीवदान अन् मग भारताच्या पडल्या तीन विकेट्स

SCROLL FOR NEXT