मुंबई

विद्यार्थ्यांनी स्पर्धा परिक्षेचे धडे

CD

विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे धडे

वाणगाव (बातमीदार) ः आसनगाव येथील स्वाती पाटील बॅचलर ऑफ फॅशन डिझाइन महाविद्यालयात स्पर्धा परीक्षांना सामोरे कसे जावे, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या वेळी कृषी प्रतिष्ठानचे अध्यक्ष मिलिंद पाटील यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. स्पर्धा परीक्षेत ग्रामीण भागातील विद्यार्थी ज्या दिवशी मोठ्या संख्येने यशस्वी होतील, तो दिवस आपल्यासाठी महत्त्वाचा असेल. येथून पुढील काळात ग्रामीण विद्यार्थ्यांनी या परीक्षेत मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवावा, असे आवाहन पाटील यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना केले. केंद्रीय लोकसेवा आयोग व महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षा, सरळसेवा परीक्षांविषयी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळावे, हा या मार्गदर्शन कार्यक्रमाचा हेतू होता.
या वेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून स्पर्धा परीक्षातज्ज्ञ डॉल्बी मोरे उपस्थित होत्या. कार्यकारी संचालिका तृप्ती पाटील, विभागप्रमुख प्रा. वैष्णवी करपे, समन्वयक प्रा. शिल्पी झा, प्रा. तेजस जाधव व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वाघ किंवा बिबट्या गावात येताच मोबाईलवर येणार अलर्ट; नागपुरात नवी यंत्रणा सुरू, AI हिंस्त्र प्राण्यांचा धोका कसा ओळखणार?

IPL 2026 Marathi News: गतविजेत्या RCB ला स्पर्धा सुरू होण्यापूर्वी झटका! प्रमुख खेळाडूच्या खेळण्यावर अनिश्चिततेचे सावट

Gas Shortage: हॉटेल व्यावसायिकांसाठी मोठा निर्णय! कमर्शियल सिलिंडरचा कोटा २० टक्के, पण 'यांनाच' मिळेल गॅस

EPFO PF Account: नोकरी बदलली? जुन्या PF खात्यातील पैशांची चिंता करू नका; ‘फॉर्म 13’ करेल सगळी मदत

राज्य शालेय पोषण आहाराची परदेशात तस्करी? सीआयडीमार्फत चौकशीची मागणी, प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT