वसईतील चित्रकाराचे चित्र प्रदर्शन
विरार (बातमीदार) : वसईतील प्रसिद्ध चित्रकार संजय म्हात्रे यांच्या चित्रांचे ‘अक्षरनाद’ हे चित्र प्रदर्शन मुंबई येथील जहांगीर कलादालनामध्ये भरविण्यात आले आहे. मागील ३० वर्षांपासून कलाक्षेत्रात कार्यरत असलेल्या म्हात्रे यांनी आतापर्यंत अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कलाप्रदर्शनामध्ये भाग घेतला आहे. वसई तालुक्यातील कलाकारांचे गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या जूचंद्र येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात ते कलाशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. कला अध्यापन करत असतानाच त्यांनी स्वतःची कलासाधना सतत सुरू ठेवली. जलरंग, तैलरंग, ॲक्रेलिक अशा विविध माध्यमांमध्ये त्यांनी आपली चित्रे सादर केली आहेत. त्यांची चित्रे अमेरिका, जर्मनी, सौदी अरेबिया, ऑस्ट्रेलिया इत्यादी देशांबरोबरच भारतातील अनेक कलारसिकांच्या संग्रही आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.