मुंबई

नांदगाव मध्ये प्रचाराची जोरदार रणधुमाळी सुरु

CD

नांदगावमध्ये प्रचाराची रणधुमाळी सुरू
मुरुड, ता. १ (बातमीदार) ः जिल्हा परिषद व मुरूड तालुका पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी नांदगावमध्ये सर्वपक्षीय उमेदवारांनी प्रचाराचा धुरळा उडवला आहे. यामुळे मुरूडमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापलेले पाहायला मिळत आहे.
सर्वपक्षीय उमेदवारांनी निवडणूक प्रचारार्थ प्रचार रथ, रॅली, वैयक्तिक भेटीगाठी कोपरा सभा, जेवणाच्या पंगतीचे मोठ्या प्रमाणात आयोजन केले आहे. यामुळे प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात निवडणुकीत चांगलाच रंग चढला आहे. मुरूड पंचायत समितीच्या ७५ नांदगाव गणात चौरंगी लढत होत असून, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व ठाकरे गटातर्फे अस्लम हलडे, भाजपचे रमेश दिवेकर, शिंदे गटाचे गणेश नाक्ती व शेकापच्या माजी सभापती नीता गिदी यांच्यात लढत होणार आहे.

राजपुरी जिल्हा परिषद मतदारसंघात थेट लढत
रायगड जिल्हा परिषदेच्या ३८ राजपुरी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, ठाकरे गट व शेकाप आघाडीचे अजित कासार व शिवसेनेचे विघ्नेश माळी यांच्यात सरळ लढत होत आहे. नांदगाव हा भाग राजपुरी मतदारसंघात येत असल्याने आणि येथे मतदारांची संख्या लक्षणीय आहे. जिल्हा परिषदेचे दोन्ही उमेदवार या भागावर विशेष लक्ष केंद्रित करून आहेत. सर्व उमेदवार येथील मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बीएमसी जिंकताच भाजपची मोठी चाल! मुंबईत ८१ सदस्यीय नवी फौज तयार; टीममध्ये उत्तर भारतीयांचा बोलबाला, कुणाकडे कोणती जबाबदारी?

T20 WC, IND vs ENG SF: अभिषेक शर्मा दुसऱ्याच षटकात गेला, संजू सॅमसन म्हणालेला, अरे घाई नको करू... ! इंग्लंडच्या रणनीतीने हैराण

Kolhapur IT Park : अखेर मंत्रीमंडळ निर्णय झालाच! कोल्हापुरात शेंडा पार्कमध्ये 34 हेक्टर 36 गुंठे जागेत आयटी पार्क विकसित करण्यासाठी प्रस्ताव मंजूर

Latest Marathi News Live Update : इस्रायलकडून इराणवर मोठे ड्रोन हल्ले

Mumbai News: सुरक्षा धर्मापेक्षा महत्त्वाची; विमानतळाजवळ नमाज पडण्याचा अधिकार नाही, मुंबई उच्च न्यायालयाचा स्पष्ट निर्णय

SCROLL FOR NEXT