नवी मुंबईत बीज देवाण-घेवाण दिवस उत्साहात
नेरूळ, ता. १ (बातमीदार) : महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या ‘माझी वसुंधरा अभियान ६.०’ अंतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागामार्फत बीज देवाण-घेवाण दिन उत्साहात साजरा करण्यात आला. महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, अतिरिक्त आयुक्त डॉ. राहुल गेठे व उद्यान विभाग उपायुक्त स्मिता काळे यांच्या नियंत्रणाखाली शहरातील विविध उद्यानांमध्ये बीज देवाण-घेवाण, बीज संकलन तसेच बीजगोळा (सीड बॉल) निर्मितीचे प्रशिक्षण देण्यात आले.
सीबीडी बेलापूरमधील मँगो गार्डन, घणसोली सेंट्रल पार्क, कोपरखैरणे निसर्ग उद्यान, वाशी व ऐरोलीतील राजीव गांधी उद्यान, तुर्भे येथील संवेदना उद्यान तसेच महापालिकेच्या शाळांमध्ये हे उपक्रम राबविण्यात आले. नागरिक, विद्यार्थी, महिला बचतगट, एनएसएस स्वयंसेवक, वृक्षप्रेमी व ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
चौकट
देशी वृक्षसंवर्धनावर भर
या उपक्रमात देशी वृक्षांच्या बियांनाच प्राधान्य देण्यात आले. चिकू, फणस, जाम, पेरू, चिंच, सिताफळ, जांभूळ, आवळा, स्टार फ्रूट व आंबा यांसारख्या झाडांच्या बियांची देवाण-घेवाण करण्यात आली. बीजगोळे तयार करण्याचे प्रात्यक्षिक देत पर्यावरण संवर्धनाचा संदेश प्रभावीपणे नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.