मुंबई

विळे येथे शिवसेनेची भव्य जाहीर सभा मोठ्या जनसमुदायाच्या साक्षीने संपन्न

CD

जनशक्ती विरुद्ध धनशक्ती निवडणूक ः गोगावले
माणगाव, ता. १ (वार्ताहर) ः निवडणूक म्हणजे जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशी आहे. तरुणांना संधी देणे हाच शिवसेनेचा खरा ध्यास आहे, असे मंत्री भरत गोगावले यांनी म्हटले आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाची सभा शनिवारी (ता. ३१) विळे येथे पार पडली. या वेळी ते बोलत होते.
सभेच्या प्रारंभी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मान्यवर व नागरिकांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. भरत गोगवले म्हणाले की, शिंदे गटाने दिलेले उमेदवार हे गरीब घरातले, शेतकऱ्यांचे कष्टकरी पुत्र आहेत. निवडून आल्यावर उमेदवारांनी जमिनीवर राहून लोकांची सेवा करणे हेच आपले कर्तव्य आहे. हीच शिवसेनेची शिकवण आहे. पक्षामध्ये स्थानिक मतभेद होणे स्वाभाविक आहे, पण पक्षाशी गद्दारी करण्याचा प्रयत्न कोणी केला, तर गाठ थेट माझ्याशी आहे, हे लक्षात ठेवा, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
या वेळी त्यांनी त्यांच्या ‘नॅपकिनच्या जादू’वर भाष्य करत सांगितले की, माझ्या नॅपकिनची जादू म्हणजे त्यामध्ये जनतेचे प्रेम आणि जनसेवेचा विचार आहे. हाच विचार घेऊन आम्ही जनतेत फिरतो. तसेच, या वेळी भरत गोगावले यांनी माणगाव येथील एमआयडीसीमध्ये प्रत्येक तरुणाला रोजगार मिळवून देण्याची हमी दिली.

पक्षप्रवेशाचे सत्र
या वेळी ठाकरे पक्षाच्या सणसवाडी येथील महिला शाखाप्रमुख मुक्ता बामूगडे यांनी अनेक महिला भगिनींसह शिंदे गटात प्रवेश केला. तसेच पाटणूस येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे दीपक येरूणकर, कुणाल मोरे, वैभव महामुनकर, प्रथमेश महामुनकर व मारुती मालुसरे यांनीही शिंदे गटात पक्षप्रवेश केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Success Story: पहिल्यांदा IPS, पण स्वप्न IASचं! किराणा दुकानदाराच्या मुलीने दुसऱ्या प्रयत्नात कसं मिळवलं यश?

Maharashtra Budget 2026 : बळिराजा लाडका! दोन लाखांपर्यंतचे पीक कर्ज माफ, बहिणींना ओवाळणी कायम

Donald Trump Fuel Price Warning : ‘इंधन दरवाढीची फिकीर नाही’ डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट जगाला दिला इशारा

Latest Marathi News Live Update : कामठीत मोकाट कुत्र्यांचा कहर, एका दिवसात १४ नागरिकांना चावा

Maharashtra Heatwave Alert : राज्यात सूर्याचा प्रकोप! अमरावतीने ओलांडली चाळीशी; पुढील 24 तास तुमच्यासाठी का आहेत महत्त्वाचे?

SCROLL FOR NEXT