‘मराठी वगनाट्य’ विषयावर परिसंवाद
मुंबई, ता. १ : साहित्य अकादमी आणि मुंबई विद्यापीठाच्या शाहीर अमर शेख अध्यासन आणि लोककला अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने ५ फेब्रुवारीला ‘मराठी वगनाट्य : परंपरा आणि योगदान’ या विषयावर विशेष परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १०:३० वाजता कलिना संकुलातील सांस्कृतिक भवनमध्ये हा परिसंवाद होईल.
या परिसंवादाचे उद्घाटन ९९व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील तसेच कुलगुरू रवींद्र कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थित होईल. या वेळी वामन केंद्रेंसह इतर मान्यवर उपस्थित असतील. ज्येष्ठ तमाशा कलाकार रघुवीर खेडकर यांचा ‘पद्मश्री’ जाहीर झाल्याबद्दल या वेळी विशेष गौरव करण्यात येईल. या कार्यक्रमात प्रभाकर ओव्हाळ, डॉ. प्रकाश खांडगे, खंडूराज गायकवाड आदी मान्यवर सहभागी होतील, अशी माहिती मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीचे विभागप्रमुख प्रा. डॉ. गणेश चंदनशिवे यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.