मुंबई

एसआयएलसी

CD

एसआयएलसी

निर्जलीकरण व्यवसायाबाबत मार्गदर्शन करणारे प्रशिक्षण

पुणे, ता. १ : निर्जलीकरण व्यवसाय संधींविषयी मार्गदर्शन करणारे प्रशिक्षण थेट निर्जलीकरण उद्योग प्रकल्पात ७ व ८ फेब्रुवारी रोजी आयोजिले आहे. प्रशिक्षणात निर्जलीकरण म्हणजे काय, या तंत्रज्ञानाचे महत्त्व, उपयोग, व्यवसाय म्हणून तो कसा करावा, निर्जलीकरणासाठीचे प्रमुख घटक, वेगवेगळ्या पद्धती, निर्जलीकरणाद्वारे तयार होणारे घटक पदार्थ व त्याचे उपयोग, उत्पादन व बाजारातील किंमत, निर्जलीकरणासाठी लागणाऱ्या मशिनरी, त्याचा फ्लो चार्ट, उपलब्ध बाजारपेठ, विपणन पद्धती, शासकीय योजना व अनुदान, प्रकल्प उभारण्यासाठी जागेची निवड, अंदाजे गुंतवणूक, प्रकल्प अहवाल इ. विषयांवर मार्गदर्शन होणार आहे. फळभाज्या, पालेभाज्या, कंद, पानवर्गीय वनस्पती, आयुर्वेदिक वनस्पती, फळे, दुग्धजन्य पदार्थ, मांस, मच्छी, चिकन या पदार्थांचे प्रात्यक्षिक होणार आहे.

आयुर्वेदिक अभ्यंग मसाज कार्यशाळा
मसाज अथवा आयुर्वेदिक अभ्यंग केल्याने आरोग्यासंबंधी तक्रारी दूर होतात व वात-पित्त-कफाचे संतुलन राखले जाते. आरोग्याच्या जागृतीमुळे गेल्या काही वर्षांत सतत वाढत असणाऱ्या या क्षेत्रात तज्ज्ञ व्यावसायिकांची मागणी आहे. याबाबत मार्गदर्शन करणारी तीनदिवसीय कार्यशाळा १३, १४ व १५ फेब्रुवारीला आयोजिली आहे. कार्यशाळेत अभ्यंग मर्दन संकल्पना, मसाजचे तंत्र, मंत्र व शास्त्र, मसाजचे फायदे, वात-पित्त-कफ प्रवृतीनुसार मसाज, उपयुक्त औषधी तेल, शिरोभ्यंग, पादाभ्यंग, विविध स्ट्रोक्स, स्नेहन, स्वेदन, पावडर मसाज, उदवर्तन, मसाज केव्हा, कधी किती वेळ करावा, कधी करू नये याबाबत प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले जाणार आहे.

गृहनिर्माण संस्था व्यवस्थापन प्रशिक्षण
सोसायटी मॅनेजर या करिअर संधीविषयीचे तीनदिवसीय प्रमाणपत्र प्रशिक्षण ‘एसआयआयएलसी’ आणि पुणे हाउसिंग फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने २०, २१ व २२ फेब्रुवारीला आयोजिले आहे. यामध्ये सोसायटी मॅनेजरची कर्तव्ये, प्रोफाइल आणि जबाबदाऱ्या, मॅनेजिंग कमिटी अजेंडा व मिनिट्स लेखन, गृहनिर्माण संस्थेतील शेअर्स आणि व्याजाचे हस्तांतर, देखभाल बिले तयार करणे, टीडीएस भरणे, ऑडिटसाठी चेकलिस्ट, लेखापरीक्षण अहवाल तयार करणे, सोसायटीचे वार्षिक विवरणपत्र सादर करणे आदी विषयांचा समावेश आहे. प्रशिक्षणार्थींना प्रात्यक्षिक अनुभवाची संधीही दिली जाणार आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यास गृहनिर्माण संस्थांमध्ये सोसायटी व्यवस्थापक म्हणून अर्धवेळ किंवा पूर्णवेळ करिअरची संधी उपलब्ध होऊ शकते अथवा गृहनिर्माण संस्थांना विविध सेवा देऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करता येऊ शकतो.

रिअल इस्टेट एजंटसाठी डिजिटल मार्केटिंग
खास रिअल इस्टेट एजंटसाठी केंद्रित २० तासांची डिजिटल मार्केटिंग कार्यशाळा १६ फेब्रुवारीपासून आयोजिली आहे. रिअल इस्टेट एजंटना स्वतःच्या अथवा ते ज्या बांधकाम व्यवसाय कंपनीसाठी काम करतात त्यांच्या व्यवसायाची मार्केटिंग करायची असेल, तर आजच्या काळात डिजिटल मार्केटिंग एवढे प्रभावी मार्केटिंग तंत्र उपलब्ध नाही. कोणत्याही कंपनीच्या किंवा संस्थेच्या प्रगतीत मार्केटिंग अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असते. बांधकाम व्यवसाय क्षेत्रात कंपनीचे उत्पादन विकण्यासाठी हे डिजिटल मार्केटिंगचे तंत्र कसे वापरावे तसेच सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन, सोशल मीडिया मार्केटिंग, मोबाईल मार्केटिंग, डिस्प्ले ॲडव्हर्टायझिंग अशा विविध तंत्रांचा उपयोग, डिजिटल मार्केटिंग कसे करावे याचे प्रगत मार्गदर्शन प्रात्यक्षिकासहित कार्यशाळेत होणार आहे. प्रतिव्यक्ती शुल्क ४,९९९ अधिक जीएसटी.
संपर्क : ८९५६३४४४७५, ७३५०००१६०२

(‘एसआयआयएलसी’च्या विविध प्रशिक्षण व कार्यशाळांची माहिती मिळवण्यासाठी व नावनोंदणीसाठी संपर्क : ८४८४८११५४४, ८९५६३४४४७२, ८९५६३४४४७१, ९३५६९७३४२७)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT