टोकावडे, ता. २ (बातमीदार) : राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांमुळे अनेक शिक्षकांना केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेला (सीटीईटी) मुकावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर सीटीईटी परीक्षेच्या तारखा पुढे ढकलण्याची मागणी कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
केंद्र सरकारमार्फत घेण्यात येणारी सीटीईटी परीक्षा ७ व ८ फेब्रुवारीला निश्चित करण्यात आली आहे. मात्र, याच कालावधीत राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर झाल्याने, मोठ्या संख्येने शिक्षकांची निवडणूक कर्तव्यावर नियुक्ती केली जाणार आहे. त्यामुळे परीक्षेला बसण्याची इच्छा असलेल्या शिक्षकांना सीटीईटीपासून वंचित राहावे लागण्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शिक्षकांसाठी सीटीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. अशा स्थितीत निवडणूक व परीक्षा तारखांचा संघर्ष हा शिक्षकांच्या भवितव्यावर परिणाम करणारा ठरू शकतो, असे आमदार म्हात्रे यांनी निवेदनात नमूद केले आहे. महाराष्ट्रातील किमान १२ जिल्ह्यांतील शिक्षकांना या समस्येचा थेट फटका बसणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने तातडीने शिक्षण आयुक्त व मुख्य सचिव यांना निर्देश देऊन केंद्र सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करावा; तसेच सीटीईटी परीक्षा पुढे ढकलण्याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.