‘एसटीटी’च्या धसक्याने
शेअर बाजार गडगडला
सेन्सेक्समध्ये १,५४७ अंशांची घसरण; सहा वर्षांतील सर्वात माेठी पडझड
मुंबई, ता. १ : फ्युचर्स अँड ऑप्शन्समधील सट्टेबाजीला आवर घालण्यासाठी सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्समध्ये (एसटीटी) वाढ करण्याच्या अर्थसंकल्पातील घाेषणेनंतर रविवारी (ता. १) शेअर बाजारांनी सहा वर्षांत एका दिवसातील सर्वात माेठी पडझड नाेंदवली. सेन्सेक्स १,५४६.८४ अंशांच्या घसरणीसह ८०,७२२.९४वर, तर निफ्टी ४९५.२० अंशांच्या घसरणीसह २४,८२५.४५ बंद झाला. बाजारांतील या उलथापालथीत गुंतवणूकदारांनी दिवसभरात ११ लाख काेटी रुपयांचे भांडवल गमावले. एसटीटीमधील वाढीमुळे बाजारातील परकीय गुंतवणुकीवर परिणाम हाेण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे.
सेन्सेक्सने दिवसभरात २,३७०.३६ अंकांचा तळ गाठून ताे ८० हजारांच्या खाली घसरला हाेता. निफ्टीत दिवसभरात ७४८.९० अंशांची घट नाेंदवण्यात आली. त्यानंतर झालेल्या घसरणीतून दाेन्ही निर्देशांक काहीसे सावरले. अर्थसंकल्पानिमित्त रविवारी शेअर बाजार सुरू हाेते. फ्युचर काॅन्ट्रॅक्टवरील एसटीटी ०.०२ टक्क्यांवरून ०.०५ टक्के करण्याची घाेषणा करताच दिवसभरात सेन्सेक्स ७९,८९९.४२, तर निफ्टी २४,५७१.७५पर्यंत घसरला हाेता. तसेच सर्व भागधारकांसाठी बायबॅकवरील कर भांडवली नफ्याप्रमाणे आकारला जाण्याची घाेषणा करण्यात आली.
‘एफ अँड ओवरील एसटीटीच्या वाढीमुळे व्यवहाराचा खर्चाचा भार पडण्याच्या भीतीमुळे गुंतवणूकदारांत नकारात्मक भावना निर्माण झाली आहे. सेन्सेक्समधील भारतीय स्टेट बॅँकेचा शेअर ५.६१ टक्क्यांनी, तर अदाणी पाेर्टचा शेअर ५.५३ टक्क्यांनी आपटला. त्याचबराेबर भारत इलेक्ट्राॅनिक्स, आयटीसी, टाटा स्टील, अल्ट्राटेक सिमेंट आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअरही गडगडले. टीसीएस, इन्फाेसिस, सन फार्मा आणि टायटन यांच्या शेअरमधील तेजीने निर्देशांकाला काहीसा हातभार लावला.
बीएसईवरील २,३७५ शेअर घसरले, १,७५९ शेअरमध्ये वाढ झाली, तर १७५ शेअरच्या भावांत काहीच परिणाम झाला नाही. गतवर्षी लादण्यात आलेल्या भांडवली लाभ करानंतर हा गुंतवणूकदारांना बसलेला दुसरा धक्का आहे, असे ॲक्सिस सिक्युरिटीजचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी प्रणव हरिदासन यांनी सांगितले. या करवाढीमुळे बाजारामधील स्पर्धात्मकतेवर परिणाम हाेऊन शकताे, अशी भीती देशांतर्गत आणि परदेशी गुंतवणूकदारांना सतावत आहे. त्याचेच पडसाद ताबडताेब शेअर बाजारात पाहायला मिळाले, असेही हरिदासन यांनी नमूद केले. एसटीटीमधील वाढीने परकीय गुंतवणुकीवर नकारात्मक परिणाम हाेण्याची शक्यता चाॅइस इक्विटी ब्राेकिंगचे संशाेधन विश्लेषक आकाश शहा म्हणाले.
अर्थसंकल्पात जागतिक व्यापार करवाढीमुळे अडचणीत सापडेल्या क्षेत्रांना दिलासा देण्याची भूमिका घेण्यात आली आहे. त्याचबराेबर डाटा सेंटर, जीसीसी, सेमिकंडक्टर, बायाेफार्मा आणि उत्पादन क्षेत्रावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे, असे जिओजित इन्व्हेस्टमेंट लिमिटेडचे संशाेधनप्रमुख विनाेद नायर यांनी सांगितले.
---
या क्षेत्रीय निर्देशांकांत घट
पीएसयू बॅँक निर्देशांकात सर्वाधिक ५.६० टक्के घसरण झाली. पाठाेपाठ धातू क्षेत्र (३.८५ टक्के), कमाॅडिटीज (३.३५ टक्के), ऊर्जा (३.१४ टक्के), भांडवली वस्तू (३.०२ टक्के), युटिलिटीज (२.९८ टक्के), औद्याेगिक क्षेत्र (२.६६ टक्के) आणि वीज (२.५२ टक्के) यांच्या निर्देशांकात घसरण झाली. केवळ माहिती-तंत्रज्ञान क्षेत्राच्या निर्देशांकाने वाढ नाेंदवली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.