कुत्र्याच्या चाव्याने मुलाचा मृत्यू
उमरोली ग्रामपंचायत हद्दीतील घटना
कर्जत, ता. १ (बातमीदार) ः तालुक्यातील उमरोली ग्रामपंचायत हद्दीत कुत्र्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या ऋषिकेश देवेंद्र पवार (वय १०) याचा एक महिना उपचार सुरू असताना मृत्यू झाला. या घटनेमुळे ग्रामपंचायत व प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
ऋषिकेश ३ जानेवारीला ट्युशनसाठी निघाला असताना समृद्धी कॉम्प्लेक्स परिसरात कुत्र्याने त्याच्यावर हल्ला केला. यात तो गंभीर जखमी झाला. स्थानिक रुग्णालयात उपचार केल्यानंतर त्याला मुंबईतील के. ई. एम. रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, ३१ जानेवारीला उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा ग्रामपंचायत व प्रशासनाकडे तक्रारी करूनही भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आली नाही, असा आरोप केला जात आहे.
----
ग्रामपंचायतीकडे मर्यादित संसाधने आहेत. स्थानिक पातळीवर गावकरी व ग्रामपंचायतीच्या सहकार्याने कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
- सुशांत पाटील, गटविकास अधिकारी, पंचायत समिती कर्जत.
--
ऋषिकेश पवार याच्या मृत्यूस स्थानिक प्रशासन जबाबदार आहे. भटक्या कुत्र्यांना खाऊ घालणाऱ्या व्यक्तींवर व संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. तातडीने बंदोबस्त न झाल्यास उपोषणास बसण्याचा इशारा देण्यात येईल.
-अनिकेत सावंत, समाजसेवक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.