ग्रोथ हबला मिळणार चालना
पुढील पाच वर्षांत पाच हजार कोटींचा निधी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ : मुंबईसह एमएमआर क्षेत्रात केंद्र सरकारकडून उभारल्या जाणाऱ्या ग्रोथ हबला आता चालना मिळणार आहे. केंद्र सरकारने त्यासाठी आज अर्थसंकल्पात तब्बल ठोस तरतूद केली असून, पुढील पाच वर्षांत पाच हजार कोटी रुपये मिळणार आहेत. त्यामुळे ग्रोथ हबमध्ये पायाभूत सुविधा उभारण्याबरोबरच आवश्यक इन्फ्रास्ट्रक्टर उभारणीला चालना मिळणार आहे.
ग्राथ हबमध्ये २०३०पर्यंत पायाभूत सुविधा, रस्ते, वेगवान वाहतुकीच्या सुविधा, घरांची मोठ्या प्रमाणात निर्मिती केली जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने प्रत्येक वर्षी एक हजार कोटी रुपयांप्रमाणे पुढील पाच वर्षे निधी देण्याची तरतूद केली आहे. त्यामुळे पुढील काळात ग्रोथ हब प्रत्यक्षात उतरताना दिसणार आहे. तसेच ‘६० मिनिटांत मुंबई’ या संकल्पनेलाही बळ मिळणार आहे.
...
मुंबई मेट्रोसाठी १,७०२ कोटी
मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील काम सुरू असलेल्या आणि प्रस्तावित असलेल्या मेट्रो मार्गिकांना आणखी वेग येणार आहे. त्यासाठी केंद्राने आज तब्बल १,७०२ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. त्यामुळे कल्याण-तळोजा-आमनदूत, ठाणे भिवंडी, मुंबई-नवी मुंबई विमानतळादरम्यान उभारल्या जाणाऱ्या प्रकल्पाला हा निधी उपलब्ध होऊ शकणार आहे. दरम्यान, मेट्रो प्रकल्पासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांकडून निधी उपलब्ध केला जातो.
...
ग्रीन मोबिलिटीसाठी १५५ कोटी
सध्या एमएमआरडीएकडून ग्रीन मोबिलिटीअंतर्गत बीकेसीमध्ये पाॅड टॅक्सी, मेट्रो, इलेक्ट्रिक बस असे प्रकल्प राबवले जात आहेत. पर्यावरणाला पूरक असलेल्या अशाच वाहतुकीच्या सुविधा मुंबई परिसरात निर्माण करण्यासाठी अर्थसंकल्पात १५५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.