उरण तालुक्यात मतदान जनजागृती बाइक रॅली
उरण, ता. १ (वार्ताहर)ः उरण तालुक्यातील विविध गावांमध्ये स्वीप कार्यक्रमांतर्गत मतदान जनजागृती सुरू आहे. ही मतदान जनजागृती उरण तालुका निवडणूक अधिकारी आविशकुमार सोनोने व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार उद्धव कदम व स्वीप पथक प्रमुख निर्मला घरत तथा गटशिक्षणाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आहे. त्यानुसार शनिवारी (ता. १) नवीन शेवे येथून मतदान जनजागृती बाइक रॅली काढण्यात आली. यामध्ये उरण तालुक्यातील सर्व शिक्षकांनी यामध्ये सहभाग घेतला.
या बाइक रॅलीची सुरुवात निवडणूक निर्णय अधिकारी आविश कुमार सोनोने, तहसीलदार डॉक्टर उद्धव कदम व निर्मला घरत, केंद्र प्रमुख यांच्या उपस्थितीत करण्यात आला. स्वीप कार्यक्रमातील सर्व शिक्षक वर्ग व तालुक्यातील सर्व शिक्षक आणि शिक्षिका यांना ''मी मतदान करणारच'' नावाची टी-शर्ट देऊन हातामध्ये विविध मतदान जनजागृती बॅनर देऊन रॅली काढण्यात आली. नवीन शेवे येथून निघालेली रॅली बोकडवीरा जेएनपीटी जासई मार्गे दिघोडे येथे समाप्त करण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.