मुंबई

स्वस्तात म्हाडाचे घराच्या बहाण्याने गंडा

CD

नवी मुंबई, ता. २ (वार्ताहर) : म्हाडाच्या सदनिका स्वस्तात मिळवून देण्याच्या प्रलोभनातून एका त्रिकुटाने ६६ लोकांकडून तब्बल तीन कोटी ६७ लाख उकळून त्यांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे यातील एका संशयिताने पत्नीला म्हाडातील वरिष्ठ अधिकारी असल्याचे भासवून, तसेच म्हाडाची बनावट कागदपत्रे तयार करून ही फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. रबाळे पोलिसांनी या गुह्यातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच या प्रकरणातील मुख्य संशयिताचा मुंबई पोलिसांकडून ताबा घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

प्रदीप डहाळे यांचे ऐरोली सेक्टर १० मध्ये कार्यालय असून, २०२२ मध्ये त्यांची ओळख रूपेश चौधरी आणि प्रभाकर शेट्टी यांच्याशी झाली होती. त्या वेळी या दोघांनी म्हाडातील वरिष्ठ अधिकारी निक्की चौधरी त्यांच्या ओळखीतील असल्याचे व त्यांच्या माध्यमातून ते म्हाडाची घरे स्वस्तात मिळवून असल्याचे डहाळे यांना सांगितले होते. या आश्वासनाला बळी पडून डहाळे यांनी स्वत:सह आपले नातेवाईक आणि मित्रमंडळी अशा ६६ जणांचे एकूण तीन कोटी ६६ लाख रुपये त्यांना दिले होते.

गुंतवणूकदारांचा विश्वास जिंकण्यासाठी संशयितांनी चक्क म्हाडाची बनावट मंजुरी यादी आणि देकार पत्रे (ऑफर लेटर) तयार करून ती सर्वांना दिली. मात्र, घरांचा ताबा मिळण्यास विलंब होऊ लागल्याने काही गुंतवणूकदारांनी आपल्या पैशांसाठी तगादा लावला. त्यामुळे संशयितांनी दबावाखाली येऊन एक कोटी २५ लाख रुपये परत केले, मात्र उर्वरित तीन कोटी ४२ लाख रुपये हडप केले. दरम्यानच्या काळात रूपेश चौधरी याचा मृत्यू झाल्यानंतर डहाळे यांनी संशयितांची माहिती काढली असता, अनेक धक्कादायक गोष्टी उघडकीस आल्या.

मुंबईतही गुन्हे दाखल
संशयितांनी निक्की चौधरीला म्हाडा अधिकारी म्हणून सादर केले होते, ती रूपेशची पत्नी असल्याचे समोर आले. तसेच या टोळीने मुंबईतही अशाच प्रकारचे गुन्हे केल्याचे समोर आले. त्यानंतर डहाळे यांनी रबाळे पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. मुंबईतील अनेक लोकांना अशाच पद्धतीने गंडा घातले असल्याने मुंबई पोलिसांनी प्रभाकर शेट्टी याला अटक केली आहे. रबाळे पोलिसांनी त्याचा ताबा घेण्याची तयारी सुरू केली आहे. तसेच निक्की चौधरी हिचा शोध सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US reduces tariff for India : मोठी बातमी! अमेरिकेने भारतावरील टॅरीफ कमी केला; ट्रम्प यांची घोषणा

Manipur Government Formation : भाजपकडून मणिपूरमध्ये सरकार स्थापनेच्या घडामोडींना वेग!, 'NDA'चे सर्व आमदार दिल्लीत दाखल

Apple Valentine Offer : ‘अ‍ॅपल’ने लाँच केली ‘व्हॅलेंटाईन डे’ स्पेशल फेस्टिव्ह कॅशबॅक ऑफर!

Rohit Shetty Firing Case : रोहित शेट्टीच्या घरावर गोळी झाडणारा अकोल्याचा; बिश्नोई टोळीच्या शुभम लोणकरने सोशल मीडियावर स्वीकारली जबाबदारी

Mohol Leopard News : मोहोळ शहरा नजीक आढळलेले बिबट्या सदृश्य प्राणी हे बिबटे नसून मार्जर कुळातील रान मांजर वनविभागाचा निर्वाळा

SCROLL FOR NEXT