मुंबई

पान ३ पट्टा

CD

रस्ता सुरक्षा अभियानाची सांगता
बोईसर (वार्ताहर) : पालघर जिल्हा पोलिस दलाने राबवलेल्या ३७व्या रस्ता सुरक्षा अभियानाची मंगळवारी (ता. ३) लालोंडे-फुलांचा पाडा, अधिकारी मैदान, संस्कृती शाळेजवळ, नागझरी येथे मोठ्या उत्साहात सांगता होणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पालघर जिल्हाधिकारी डॉ. इंद्राणी जाखड (भा.प्र.से.), मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे (भा.प्र.से.) उपस्थित राहणार आहेत. तर पोलिस अधीक्षक यतिश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम होणार आहे. नाटिका, सादरीकरणांच्या माध्यमातून वाहतूक नियमांचे पालन, अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती, बालविवाह प्रतिबंध, शिक्षणाचे महत्त्व व पर्यावरण संरक्षण यांसारख्या विषयांवर जनजागृती केली जाणार आहे. या कार्यक्रमात आरोग्य शिबिर, न्यायालयीन विधिमंडळाचे विशेष अधिकारी अपघात विमा, संबंधित कायदेशीर बाबींवर मार्गदर्शन करणार आहेत.
ः-----------------------------------------
बोईसरमध्ये अजित पवार यांना भावपूर्ण मानवंदना
बोईसर (वार्ताहर) ः राज्याच्या राजकारणात आपल्या कणखर निर्णयक्षमता, प्रशासकीय पकड आणि सर्वसामान्य जनतेशी असलेल्या थेट नात्यामुळे वेगळी ओळख निर्माण करणारे राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाने संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. त्यांच्या निधनाने राज्याच्या राजकारणात निर्माण झालेली नेतृत्वाची पोकळी दीर्घकाळ भरून न निघणारी असल्याची भावना सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे. अजित पवार यांच्या पवित्र स्मृतीस श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी बोईसर येथील यशवंत सृष्टी परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालयात भावपूर्ण श्रद्धांजली सभा घेण्यात आली. या श्रद्धांजली सभेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, व्यापारी तसेच शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
़़़़ःः-----------------------------------------
नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार
विरार (बातमीदार) ः नागरी समस्या निवारण समिती वसईतर्फे समाजसेवा मंडळ निर्मळ येथे उत्तर वसईतील पश्चिम पट्ट्यातील नवनिर्वाचित १४ नगरसेवकांचा सत्कार समारंभ करण्यात आला. या वेळी समितीचे अध्यक्ष ॲड. विल्यम फर्नांडिस यांनी पाणीपुरवठा, वीज, रस्ते, बससेवा, गटारे, पादचारी रस्ता, आरोग्य व्यवस्था, हरित पट्टा, तलाव सुशोभीकरणाबाबत समस्या मांडल्या. विविध संघटनेतर्फे नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार केला गेला. नगरसेवक मार्शल यांनी केलेल्या कार्याचा आढावा सादर केला. तसेच कामे येत्या दोन वर्षांत पूर्ण होतील, अशी हमी दिली. तर डॉमिनिक रुमाव यांनी विश्वासाला तडा जाऊन देणार नाही, असे आश्वासन दिले.
-----------------------------------------
विज्ञान प्रदर्शनात उत्तेजनार्थ क्रमांक
विरार (बातमीदार) ः राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात खानिवडेतील प्रतिभा विद्यामंदिर शाळेने दिव्यांग गटातून उत्तेजनार्थ क्रमांक मिळवला आहे. या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात दिव्यांग गटातून दोन विजेते निश्चित केले जातात. या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात विज्ञान शिक्षक, प्रकल्पाचे मार्गदर्शक नंदकुमार मांद्रे व विद्यार्थी प्रतिनिधी कुमारी कस्तुरी भोईरने अतिशय उत्तम सादरीकरण करून शाळेचे, तालुक्याचे, जिल्ह्याचे नाव राज्यस्तरावर पोहोचवले. द्वितीय क्रमांकाचे बक्षीस मिळवले. या यशाबद्दल शाळेचे अध्यक्ष नरसुभाऊ पाटील, मुख्याध्यापक महेश कुडू यांनी अभिनंदन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US visa fraud case: अमेरिकेत दरोड्यांचं थरारक नाटक… पण CCTV ने उघड केली खेळी; व्हिसासाठी रचलेल्या कटात १० भारतीय अटकेत!

Purandar IT Park Plan : पुण्याच्या IT क्षेत्राचा चेहरामोहरा बदलणार! 572 हेक्टर जमिनीवर सरकारचा मोठा मास्टरप्लॅन, पुरंदरमध्येही IT पार्कसाठी सरकार सकारात्मक

Latest Marathi News Live Update : श्री अंबाबाई मूळ मूर्तीचे दर्शन आजपासून बंद, चार दिवस होणार गाभारा संवर्धन प्रक्रिया

पाकिस्तानी फलंदाजाच्या धावबादचा वाद! मोहम्मद कैफ बांगलादेशच्या कर्णधारावर भडकला, म्हणाला, हे चुकीचं

ELIMINATION: 'बिग बॉस मराठी ६' मधून 'या' स्पर्धकाचा पत्ता कट; या आठवड्यात घराबाहेर झाली अनेकांची आवडती व्यक्ती

SCROLL FOR NEXT