मुंबई

‘लाडक्या बहीणां’ना मनस्ताप

CD

‘लाडक्या बहिणीं’ना मनस्ताप
जव्हारमध्ये ई-केवायसीत अडचणी, हजारो लाभार्थी वंचित
संदिप साळवे ः सकाळ वृत्तसेवा
जव्हार, ता. २ ः राज्य शासनाच्या लाडकी बहीण योजनेमुळे ग्रामीण भागात महिलांना आर्थिक आधार मिळाला आहे. मात्र, ई-केवायसीसाठीची हेल्पलाइन सतत व्यस्त असल्याने जव्हारसारख्या ग्रामीण भागात हातावर पोट असणाऱ्या महिला लाभापासून वंचित आहेत.
जव्हार तालुक्यात शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून अमुलाग्र बदल झालेला दिसून येत आहे. महिला बचत गटाच्या माध्यमातून अनेक उपक्रम सुरू आहेत. अशातच ग्रामीण भागातील महिलांना ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेतून दिलासा मिळाला आहे. या योजनेच्या सुरुवातीचे काही महिने महिल्यांच्या खात्यावर पैसे जमा झाल्याने चेहऱ्यावर हसू उमलले, मात्र गेल्या तीन महिन्यांपासून मोबाईलवर संदेश येणे बंद झाले आहे. त्यामुळे कधी बँकेची पायरी पार करत, तर कधी तहसील कार्यालयाच्या चकरा मारण्याची वेळ आली आहे. अशातच आता जव्हार तालुक्यातील हजारो महिला सध्या ई-केवायसीच्या तांत्रिक जंजाळात अडकल्या आहेत.
-------------------------
हेलपाटे मारण्याची वेळ
महिला व बालविकास विभागाने तक्रारींच्या निवारणासाठी १८१ हेल्पलाइन क्रमांक जाहीर केला आहे. मात्र, हा क्रमांक नावापुरता उरल्याचा अनुभव महिलांना येत आहे. दिवसभर फोन लावूनही हा क्रमांक सतत व्यस्त लागतो किंवा लागतच नाही. फोनवर कोणाशी बोलावे, हे समजत नाही. तसेच कार्यालयात गेल्यावर कोणी नीट उत्तर देत नसल्याने तालुक्यातील हजारो महिलांची पंचायत समिती, तहसील कार्यालयात हेलपाटे मारावे लागत आहेत.
--------------------------
तांत्रिक चुकांचा फटका
लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसी बंधनकारक करण्यात आली आहे. मात्र, या प्रक्रियेबाबत ग्रामीण भागातील महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम आहे. मोबाईलवरून प्रक्रिया पूर्ण करताना तांत्रिक चुकांमुळे अनेक महिलांचे नाव लाभार्थी यादीतून बाजूला पडले आहे. जव्हार तालुक्यातील अनेक महिलांच्या तक्रारीनुसार प्रक्रिया पूर्ण झाल्याचे दाखवत असले, तरी प्रत्यक्षात बँकेत पैसे जमा होत नाहीत.
-----------------------------
प्रशासकीय समन्वयाचा अभाव
जव्हार तालुक्यात बँका आणि ई-सेवा केंद्रे यांच्यामध्ये समन्वयाचा अभाव आहे. आधार लिंकिंग, बँक खाते सक्रिय असूनही केवळ ई-केवायसीच्या चुकीच्या माहितीमुळे सन्माननिधी थांबण्यात आला आहे. त्यामुळे शासनाने तातडीने तोडगा काढून पालघर जिल्ह्यासाठी स्वतंत्र हेल्पलाइन किंवा तक्रार निवारण कक्ष सुरू करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
------------------------------
तक्रारींचा पाऊस
जव्हारमधील तहसील कार्यालयांत आणि पंचायत समितीच्या महिला व बालकल्याण विकास कार्यालयात दररोज शेकडो महिला लाडकी बहीण योजनेचा हप्ता का थांबला, याची विचारणा करण्यासाठी येत आहेत. सुरुवातीला अत्यंत सोपी वाटणारी ही योजना निकषांच्या कात्रीत अडकल्याची भावना महिलांमध्ये निर्माण झाली आहे. सत्तेत आल्यानंतर सरकारने योजनेकडे पाठ फिरवल्याची शंका लाभार्थ्यांमध्ये आहे.
----------------------------------
जव्हार तालुक्यात गरजू महिलांनी दीड हजारांच्या आशेने बँकेचे उंबरठे झिजवले; पण पदरी फक्त निराशाच आली. चुकीची ई-केवायसी झाली म्हणतात, पण आम्हाला सांगणार कोण? साहेबांच्या हेल्पलाइनवर कधी फोन लागत नाही.
- आशा दुसरे, माजी पंचायत समिती, सदस्य
----------------------------
निवडणुकीपुरते लाडकी बहीण म्हणून हाका मारल्या, पण आता आमच्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. तीन महिने झाले तरी खात्यावर एक रुपया आला नाही. सरकारने आमचा रखडलेला हप्ता तातडीने जमा करावा.
- वंदना दरोडा, माजी सरपंच

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्रियांका चोप्राने मुलीच्या जन्मासाठी सरोगसी करायचं का ठरवलं? ट्रोल करणाऱ्यांना उत्तर देत म्हणाली- माझं बाळ हे...

Petrol Storage: भारतात पेट्रोलचा साठा कसा आणि कुठे केला जातो? जाणून घ्या भारताच्या स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्हची संपूर्ण माहिती

Latest Marathi News Live Update : नवी मुंबई महापालिकेचा गोंधळ; परिवहन सभापतींसाठी कॅबिनच नाही

Arjun Tendulkar Marriage: अर्जुनचं लग्न लागलं, वरमाळा घालताच सानियाला मारली मिठी; सचिन-अंजली अन् साराही खूश; Video Viral

Rajya Sabha Election Maharashtra : राज्यसभेसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटचा दिवशी शिंदे गटाकडून उमेदवार निश्चित, एकनाथ शिंदेंचा धक्कातंत्र

SCROLL FOR NEXT