प्रजासत्ताकदिन सप्ताहानिमित्त तरुणांचा माहितीपूर्ण देखावा
ठाणे, ता. २ (बातमीदार) : प्रजासत्ताकदिनाच्या सप्ताहानिमित्त सुरू असलेल्या देशव्यापी मोहिमेचा भाग म्हणून ठाण्यातील तरुणांनी दूध आणि बीफ उद्योगांमधील परस्पर संबंधांवर लक्ष वेधले आहे. ठाणे ॲनिमल लिबरेशन अलायन्स यांच्या वतीने प्राणी हक्क संघटनेने तळाव पाळी परिसरात शनिवारी (ता. ३१) माहितीपूर्ण आणि प्रभावी देखावा सादर करून या विषयावर नागरिकांशी चर्चा करत जनजागृती केली.
सरकारी आणि जागतिक आकडेवारीनुसार भारत हा जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश असून, बीफचा प्रमुख निर्यातदार देश आहे. दूध उत्पादनासाठी उभी असलेली यंत्रणाच पुढे बीफ उद्योगाला कच्चा माल पुरवते, असा दावा या मोहिमेतून करण्यात आला. प्राणी हक्क कार्यकर्ता दर्शन यांच्या मते दुग्धव्यवसायाचे वास्तव बहुतांश नागरिकांपर्यंत पोहोचत नाही. गायी आणि म्हशींना वारंवार गर्भधारणेस भाग पाडणे, वासरांना जन्मानंतर लगेचच आईपासून वेगळे करणे, तसेच दूध उत्पादन कमी झाल्यावर प्राण्यांना सोडून देणे किंवा विकणे, ही या उद्योगातील सामान्य पद्धत असल्याचे त्यांनी सांगितले.
ठाण्यातील रहिवासी आणि प्राणी हक्क कार्यकर्ता तनय म्हणाले, रस्त्यांवर जखमी किंवा कुपोषित गायी दिसतात, पण त्या कुठून आल्या याकडे आपण दुर्लक्ष करतो. दूध देणे बंद झाल्यावर अनेक गायी डेअरीमधूनच रस्त्यावर येतात. या साखळीचे वास्तव समजून घेण्यासाठी ‘माँ का दूध’ हा माहितीपट पाहण्याचे आवाहनही त्यांनी केले. या मोहिमेत सहभागी कार्यकर्त्यांनी दुग्ध उद्योग, मांस व्यापार आणि चामडे उद्योग यांच्यातील अतूट संबंधांवर असलेले मौन तोडणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. पुणे, बंगळूर, जयपूरसह देशातील आणखी दहा शहरांमध्येही अशा प्रकारचे सार्वजनिक उपक्रम आयोजित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.