मुंबई

उच्च न्यायालयाच्या ताशेऱ्यानंतर पालिकेला जाग

CD

बदलापुरात पालिकेचा ‘हातोडा’ चालणार
४३१ अनधिकृत बांधकामांची यादी जाहीर; न्यायालयाच्या दणक्यानंतर प्रशासनाला जाग

बदलापूर, ता. १ (बातमीदार) : मुंबई उच्च न्यायालयाने कुळगाव-बदलापूर नगर परिषदेच्या ढिसाळ कारभारावर ओढलेले कठोर ताशेरे आणि मुख्याधिकाऱ्यांची केलेली खरडपट्टी अखेर फळाला आली आहे. झोपेतून जागे झालेल्या पालिका प्रशासनाने शहरातील ४३१ अनधिकृत बांधकामांची यादी जाहीर केली असून, आजपासून या बांधकामांना जमीनदोस्त करण्याची धडक मोहीम हाती घेतली आहे.

शहरात बेसुमार बेकायदेशीर बांधकामे उभी राहत असताना प्रशासन डोळे मिटून का बसले आहे? असा संतप्त सवाल न्यायालयाने उपस्थित केला होता. ‘‘अशा अधिकाऱ्यांची बदली गडचिरोलीला नाही, तर चंद्रपूरला करायला हवी,’’ अशा शब्दांत न्यायालयाने प्रशासनाचा हलगर्जी चव्हाट्यावर आणला होता. या न्यायालयीन दणक्यानंतर प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली असून कारवाईचे नियोजन करण्यात आले आहे.

नगरपालिकेने स्पष्ट केले आहे की, जाहीर केलेल्या ४३१ बांधकामांवर येत्या १० ते १२ दिवसांत टप्प्याटप्प्याने कारवाई केली जाईल. यामध्ये कोणत्याही प्रकारचा राजकीय दबाव किंवा वशिलेबाजी चालणार नाही, असा इशाराही देण्यात आला आहे. शहर नियोजन, सुरक्षितता आणि वाहतुकीचे अडथळे दूर करण्यासाठी ही मोहीम निर्णायक मानली जात आहे.

निष्पक्ष कारवाई हवी
शहरातील जागरूक नागरिकांनी या मोहिमेचे स्वागत केले आहे. मात्र, ही कारवाई केवळ न्यायालयीन रोष टाळण्यासाठी असलेला ''दिखावा'' ठरू नये, तर ती कायमस्वरूपी आणि निष्पक्ष असावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. मोठे विकासक आणि राजकीय पाठबळ असलेल्या बांधकामांवरही पालिकेचा हातोडा पडणार का? याकडे आता संपूर्ण बदलापूरकरांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Success Story: पहिल्यांदा IPS, पण स्वप्न IASचं! किराणा दुकानदाराच्या मुलीने दुसऱ्या प्रयत्नात कसं मिळवलं यश?

Maharashtra Budget 2026 : बळिराजा लाडका! दोन लाखांपर्यंतचे पीक कर्ज माफ, बहिणींना ओवाळणी कायम

Donald Trump Fuel Price Warning : ‘इंधन दरवाढीची फिकीर नाही’ डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट जगाला दिला इशारा

Latest Marathi News Live Update : कामठीत मोकाट कुत्र्यांचा कहर, एका दिवसात १४ नागरिकांना चावा

Maharashtra Heatwave Alert : राज्यात सूर्याचा प्रकोप! अमरावतीने ओलांडली चाळीशी; पुढील 24 तास तुमच्यासाठी का आहेत महत्त्वाचे?

SCROLL FOR NEXT