सीबीएसई दहावीच्या विद्यार्थ्यांना मदत
प्रभादेवी, ता. २ ः शिक्षण कंपनी फिजिक्सवाला (पीडब्ल्यू) यांनी विद्यार्थ्यांना सहाय्य करणाऱ्या उपक्रमाची घोषणा केली आहे. या उपक्रमांतर्गत २०२६ मध्ये इयत्ता दहावीची सीबीएसई बोर्ड परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना शंकानिरसन सहाय्य सुविधा मोफत पुरविण्याचा मानस असल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार देशभरातील विद्यार्थ्यांना मोफत शंकानिरसन आणि तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळणार आहे. हा उपक्रम पीडब्ल्यू विद्यार्थ्यांसह देशभरातील कोणत्याही इयत्ता दहावीमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी खुला आहे. पीडब्ल्यू देशभरात विज्ञान व गणित विषयामधील ऑफलाइन प्रीबोर्ड परीक्षेची सुविधादेखील पुरविणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.