मुंबई

एमएसईबी कार्यालयात गोंधळ ;

CD

एमएसईबी कार्यालयात गोंधळ
शासकीय कामात अडथळा; बापलेकांविरोधात गुन्हा दाखल
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २ : वसंत विहार येथील महावितरण (एमएसईबी) कार्यालयात थकीत वीजबिलाच्या कारणावरून झालेल्या वादातून कर्मचाऱ्यांना शिवीगाळ, धमकी व मारहाण केल्याची गंभीर घटना समोर आली आहे. याप्रकरणी चितळसर पोलिस ठाण्यात बापलेकांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार शनिवार (ता. ३१) घडला आहे.
रायगड येथे राहणारे तथा तक्रारदार सोमनाथ मुंढे यांनी याबाबत तक्रार दिली आहे. सोमनाथ मुंढे वसंत विहार येथे कनिष्ठ कार्यालयीन सहाय्यक आहेत. एमएसईबी कार्यालयातील विद्युत सहाय्यक किरण येरणे हे थकीत बिलाबाबत चौकशी करण्यासाठी एएमसी क्लिनिक येथे गेले होते. या कारवाईचा राग मनात धरून वापरकर्ता आर्यनकुमार सहा हा एमएसईबी कार्यालयात आला. या वेळी त्याने कार्यालयातील कर्मचारी गणेश जाधव व उमेश देशमुख यांच्याशी वाद घालत शिवीगाळ केली. याच वेळी आर्यनकुमार याने किरण येरणे यांनाही अश्लील शिवीगाळ करत धमकावले.
दरम्यान, आर्यनकुमार सहा याचे वडील अतिनकुमार सहा यांनी एमएसईबी कर्मचारी आणि सुरक्षा रक्षक देविदास सोनावणे यांच्याबरोबर हे भांडण सुरू असताना, सोमनाथ मुंढे यांनी मध्यस्थी केली. या वेळी आर्यनकुमार व अतिन कुमार सहा या बापलेकांनी मुंढे यांना मारहाण केली. यामुळे कार्यालयात सुरू असलेल्या शासकीय कामकाजात अडथळा निर्माण झाला. याप्रकरणी चितळसर पोलिस ठाण्यात आर्यनकुमार सहा व अतिन कुमार सहा यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला असून, पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील वरुडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्रियांका चोप्राने मुलीच्या जन्मासाठी सरोगसी करायचं का ठरवलं? ट्रोल करणाऱ्यांना उत्तर देत म्हणाली- माझं बाळ हे...

Petrol Storage: भारतात पेट्रोलचा साठा कसा आणि कुठे केला जातो? जाणून घ्या भारताच्या स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्हची संपूर्ण माहिती

Latest Marathi News Live Update : नवी मुंबई महापालिकेचा गोंधळ; परिवहन सभापतींसाठी कॅबिनच नाही

Arjun Tendulkar Marriage: अर्जुनचं लग्न लागलं, वरमाळा घालताच सानियाला मारली मिठी; सचिन-अंजली अन् साराही खूश; Video Viral

Rajya Sabha Election Maharashtra : राज्यसभेसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटचा दिवशी शिंदे गटाकडून उमेदवार निश्चित, एकनाथ शिंदेंचा धक्कातंत्र

SCROLL FOR NEXT