मुंबई

रस्त्यावरची शिस्त हीच कुटुंबावरील प्रेमाची पावती!

CD

नवी मुंबई, ता. २ (वार्ताहर) : रस्त्यावरची शिस्त ही केवळ कायद्याची भीती नसून ती आपल्या कुटुंबावरील प्रेमाची पावती आहे, अशा शब्दांत मराठी अभिनेता स्वप्नील जोशी याने नवी मुंबईकरांना साद घातली. निमित्त होते नवी मुंबई पोलिस आयोजित रस्ता सुरक्षा अभियानाचे. आपल्या दिलखुलास अभिनयाने घराघरात पोहोचलेल्या स्वप्नीलने या वेळी एक अभिनेता म्हणून नाही, तर एका जबाबदार नागरिक आणि पित्याच्या भूमिकेतून विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

आई-वडिलांना जे नियम पोलिस किंवा दंड शिकवू शकत नाहीत, ते त्यांची मुले शिकवू शकतात. मुले ही घराचा आरसा असतात. जर मुलांनी हट्ट धरला की बाबा, हेल्मेट घातल्याशिवाय गाडी काढायची नाही, तर कोणताही बाप तो नियम मोडणार नाही. हेल्मेट घालणे हे पोलिसांच्या फायद्यासाठी नाही, तर आपल्या जीवासाठी आहे, हे संस्कार आता मुलांनीच पालकांमध्ये रुजवायचे आहेत, असे स्वप्नील जोशी यांनी स्पष्ट केले. या वेळी नवी मुंबईचे पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे, सहपोलिस आयुक्त संजय येनपुरे, महामार्ग वाहतूक विभागाचे अधीक्षक तानाजी चिखले, वाहतूक विभागाचे पोलिस उपआयुक्त तिरुपती काकडे, परिमंडळ-१चे उपायुक्त पंकज डहाणे, परिमंडळ-३चे उपायुक्त प्रशांत मोहिते उपस्थित होते.

‘आई-बाबांचे रिपोर्ट कार्ड’चे कौतुक
नवी मुंबईचे पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या संकल्पनेतून राबविल्या जाणाऱ्या आई-बाबांचे रिपोर्ट कार्ड या उपक्रमाचे जितेंद्र जोशी यांनी विशेष कौतुक केले. पालक रस्त्यावर कसे वागतात, याचे गुण आता मुले देणार आहेत. हा उपक्रम केवळ नवी मुंबईतच नव्हे, तर संपूर्ण देशभर राबवला जावा, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.

पोलिस आयुक्तांकडून चिंता
पोलिस आयुक्त भारंबे यांनी गेल्या वर्षभरातील अपघाताची आकडेवारी सादर करताना चिंता व्यक्त केली. गेल्या वर्षभरात २६७ जणांचा अपघाती मृत्यू झाला असून, त्यापैकी ५० टक्क्यांपेक्षा जास्त दुचाकीस्वार आहेत. आम्ही नऊ लाख ८० हजार ई-चलान फाडली, हजारो मद्यपिंवर कारवाई केली, पण जोपर्यंत नागरिक स्वत:हून शिस्त पाळत नाहीत, तोपर्यंत हे मृत्यू थांबणार नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले.

गरज पडल्यास पालकांना टोका!
पोलिस आयुक्तांनी उपस्थित विद्यार्थ्यांना छोटा पोलिस म्हणून जबाबदारी सोपवली. तुमचे आई-वडील, भाऊ-बहीण हेल्मेट वापरतात की नाही किंवा सीटबेल्ट लावतात की नाही, याचे निरीक्षण करा. त्यांनी नियम मोडल्यास त्यांना प्रेमाने, पण ठामपणे टोका, असे आवाहन त्यांनी केले.

गाण्यातून जागृतीचा प्रयत्न
पोलिस उपआयुक्त तिरुपती काकडे यांनी गेल्या चार वर्षांत नवी मुंबई वाहतूक विभागाकडून राबविण्यात आलेल्या वेगवेगळ्या नावीन्यपूर्ण उपक्रमाची माहिती दिली. या कार्यक्रमाचे आकर्षण ठरले ते, पुरुष आणि महिला यांच्या दोन्ही आवाजात गाणारे कलावंत साईराम अय्यर यांचे ‘ए मेरे वतन के लोगो’ हे गाणे. या गाण्यातून अय्यर यांनी वाहतुकीचे नियम स्वत:सह पालकांना आणि नातेवाईक यांना सांगण्याचे आवाहन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FACT CHECK : पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर ICC कडून एका वर्षाच्या बंदीची कारवाई? PSL वर बंदी, महसूलात कपात अन् बरंच काही...

Pune BJP Respects Ajit Pawar : पुण्याच्या महापौर-उपमहापौर निवडीनंतर भाजप जल्लोष करणार का? अजित पवारांच्या निधनामुळे घेतला मोठा निर्णय

Latest Marathi News Live Update : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा अस्थिकलश सांगलीमध्ये दाखल

Who is Parshuram Wadekar? : कोण आहेत पुण्याचे उपमहापौर परशूराम वाडेकर? धीरज घाटे यांनी केली घोषणा!

"मला एकही फोन न करता देवाघरी गेली" प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीला मातृशोक ; दोन महिन्यापूर्वीच झालेलं लग्न

SCROLL FOR NEXT