मुंबई

साखरपाड्यात नळ पाणीपुरवठा योजनेला सुरुवात

CD

वज्रेश्वरी, ता. २ (बातमीदार) : परिसरातील साखर पाडा येथे अनेक वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई भासत होती. आता येथे नळ पाणीपुरवठा योजनेला सुरुवात करण्यात आल्याने ही टंचाई दूर होणार आहे.
पाणी समस्येमुळे येथील नागरिक, विशेषतः महिला मोठ्या प्रमाणावर त्रस्त होत्या. पाणी मिळवण्यासाठी महिलांना दररोज डोक्यावरून हंडे वाहत दूरवर जावे लागत होते, ही परिस्थिती अत्यंत कष्टदायक आणि आरोग्यास मारक ठरत होती. या गंभीर समस्येची दखल घेत लायन्स क्लब ऑफ नॉर्थ बॉम्बे आणि जाणिव प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून नागरिकांच्या अडचणी समजून घेण्यात आल्या. त्यानंतर तत्काळ पुढाकार घेत साखर पाडा येथे नळ पाणीपुरवठा योजनेला सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमावेळी गावातील महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. ‘आता डोक्यावरचा हंडा उतरणार’, या भावनेने महिलांच्या चेहऱ्यावर समाधानाचा आणि आनंदाचा भाव स्पष्टपणे दिसून येत होता. नळ पाणीपुरवठा सुरू झाल्याने महिलांचा वेळ, श्रम यांची मोठ्या प्रमाणावर बचत होणार असून, गावातील जीवनमानात सकारात्मक बदल घडून येणार आहे. पाण्यासारख्या मूलभूत गरजेची पूर्तता झाल्याने साखर पाडा येथील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांचा गुढीपाडवा गोड होणार! २००० रुपये खात्यात जमा, २२वा हप्ता देत पंतप्रधानांचे मोठं वक्तव्य

बिग बॉस नंतर आयुष संजीवची नवी इनींग ! 'या' गाण्याचं केलं दिग्दर्शन आणि कोरियोग्राफी

Fridge Vastu Tips: फ्रिजच्यावर 'या' 3 गोष्टी ठेवू नका, अन्यथा निर्माण होतात वास्तुदोष

Latest Marathi News Live Update : परळीच्या धारावती तांड्यावर 16 वर्षीय मुलीवर अत्याचार झाल्याची घटना

Akola News: बहिणीच्या विरहात भावाचा जीव गेला; अंत्यसंस्कारानंतरच हृदयविकाराचा झटका

SCROLL FOR NEXT