मुंबई

कल्याणमध्ये ''अस्मिता रोल बॉल लीग'' उत्साहात

CD

कल्याणमध्ये अस्मिता रोल बॉल लीग उत्साहात
कल्याण (प्रतिनिधी) ः कल्याण येथील ब्रायटन स्कूलमध्ये अस्मिता रोल बॉल लीग २०२५-२६ या स्पर्धा अत्यंत उत्साहात पार पडल्या. या लीगमध्ये ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील एकूण १६ नामांकित संघांनी आपला सहभाग नोंदवत खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन केले. स्पर्धेच्या उद्घाटन आणि पारितोषिक वितरण समारंभाला विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी हजेरी लावून खेळाडूंचा उत्साह वाढवला. याप्रसंगी हॉली क्रॉस शाळेच्या मुख्याध्यापिका जॅसिंथा सुआरेस व उपमुख्याध्यापिका प्रिसिला लोबो, तसेच भारतीय रोल बॉल संघटनेचे सचिव प्रताप पगार यांनी उपस्थित राहून विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन केले आणि त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या वेळी डॉ. शर्मिला पांडे, शिवसेना शहरप्रमुख रवी पाटील, माजी नगरसेवक सुनील वायले, नवनिर्वाचित नगरसेविका प्रमिला पाटील, शालिनी वायले, डॉ. तनुजा वायले आणि किरण भांगले यांसह इतर मान्यवर उपस्थित होते. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अपर्णा सेतूरमण, ऐश्वर्या मदणे-गाडे, शोभा कावरे, संजय मुसळे, रवींद्र देसाई, राहुल पाटील आणि प्रसाद ढवळे यांनी विशेष परिश्रम घेतले व खेळाडूंना मोलाचे मार्गदर्शन केले. रोल बॉलसारख्या खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी अशा स्पर्धांचे आयोजन होणे, काळाची गरज असल्याचे मत या वेळी मान्यवरांनी व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा मोठी 'खेळी'! ठाकरे गटातील खासदार शिंदेसेनेत येणार? एकनाथ शिंदेंची दिल्लीत गुप्त रणनीती

सुरज चव्हाण होणार बाबा? बायकोच्या 'त्या' पोस्टने वेधलं सगळ्यांचं लक्ष, Viral Video

120000000000! राजस्थान रॉयल्स फ्रँचायझी विकणे आहे; भारताची मोठी कंपनी तगडी रक्कम मोजून बनणार मालक, ४ स्पर्धक शर्यतीत

Latest Marathi News Live Update : पंढरपूर येथील सांगोला पेपर चोरी प्रकरण; दोन विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात

Pune Rain: पुण्यात पावसाला सुरुवात! कोथरुड, बाणेर भागात ढगांचा गडगडाट; हवामान विभागाचा अलर्ट

SCROLL FOR NEXT