मुंबई

नगरसेविकेच्या समर्थकांची गुंडगिरी : घरात घुसून महिलांना मारहाण

CD

नगरसेविकेच्या समर्थकांची गुंडगिरी
घरात घुसून महिलांना मारहाण; मध्यस्थी करणाऱ्यावर हल्ला
अंबरनाथ, ता. २ (वार्ताहर) : लहान मुलांच्या खेळण्यावरून सुरू झालेला किरकोळ वाद थेट राजकीय संघर्षात बदलल्याची घटना अंबरनाथमध्ये घडली. या प्रकरणात घरात घुसून महिलांना मारहाण करण्यात आल्याचा तसेच पोलिस ठाण्याच्या आवारातच मध्यस्थी करणाऱ्या व्यक्तीवर जीवघेणा हल्ला झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे अंबरनाथ पश्चिमेतील बुवाबाडा परिसरात खळबळ उडाली आहे.

अंबरनाथ पश्चिम येथील बुवाबाडा परिसरात रविवारी दुपारी लहान मुले खेळत असताना एका मुलाने फेकलेला दगड आठवर्षीय अंश तिवारी याच्या डोक्याला लागून तो गंभीर जखमी झाला. यानंतर हा वाद कुटुंबापर्यंत पोहोचला. पीडित कुटुंबाच्या तक्रारीनुसार, संबंधित मुलाच्या वडिलांसह शिवसेना (शिंदे गट)च्या नगरसेविका किरण चौबे यांच्या काही समर्थकांनी थेट घरात घुसून महिलांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यामध्ये सरिता तिवारी या गंभीररीत्या जखमी झाल्या. तर हा वाद वाढू नये म्हणून दोन्ही गट पोलिस ठाण्यात आले असता, मध्यस्थी करण्यासाठी उपस्थित असलेले भाजपसमर्थक रोशन राय यांच्यावर नगरसेविकेच्या समर्थकांनी पोलिस ठाण्याच्या आवारातच गुप्तांगावर लाथ मारून हल्ला केल्याचा आरोप राय यांनी केला. त्यामुळे परिस्थिती अधिकच तणावपूर्ण बनली. याप्रकरणी अंबरनाथ पोलिसांनी परस्परविरोधी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करून एकाला ताब्यात घेतले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मी खिलाडूवृत्ती दाखवली असती! Run Out वर सलमान अली आघाची प्रतिक्रिया; सचिनला बाद केले तेव्हा विसरलेले sportsmanship

FASTag Annual Pass वार्षिक टोल पास झाला महाग, १ एप्रिलपासून नवे दर लागू

Nashik LPG Supply : नाशिककरानो घाबरू नका! जिल्ह्यात पुरेसा गॅस साठा; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

Nutritionist Health Tips: तुम्हाला 35 वर्षानंतरही राहायचंय फिट आणि निरोगी? न्यूट्रिशनिस्टच्या ‘या’ टिप्स नक्की फॉलो करा

Iran Israel War मुळे भारतात दारूचा दुष्काळ? उन्हाळ्यात थंड बिअरही मिळणार नाही? उत्पादनावर काय परिणाम होणार

SCROLL FOR NEXT