मुंबई

महाराष्ट्रासाठी रेल्वेला २३,९२६ कोटींची विक्रमी तरतूद

CD

महाराष्ट्रातील रेल्वेसाठी २३,९२६ कोटींचा निधी
अमृत भारत स्थानकांना गती

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ : केंद्रीय अर्थसंकल्प २०२६-२७ मध्ये महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी तब्बल २३ हजार ९२६ कोटी रुपयांची विक्रमी तरतूद करण्यात आल्याची माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. काँग्रेस सरकारच्या काळातील निधीच्या तुलनेत ही तरतूद सुमारे २० पट अधिक असून, यामुळे राज्यातील रेल्वे पायाभूत सुविधांना मोठी चालना मिळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी रविवारी देशाचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी भरीव तरतूद करण्यात आली असून, त्याबाबत माहिती देताना वैष्णव यांनी सांगितले की, भारतीय रेल्वेसाठी २०२६-२७च्या अर्थसंकल्पात एकूण दोन लाख ७८ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यापैकी महाराष्ट्रासाठीच २३ हजार ९२६ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. सध्या महाराष्ट्रात बुलेट ट्रेन, हायस्पीड रेल्वे आणि डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरसह सुमारे एक लाख ७० हजार कोटी रुपयांचे विविध रेल्वे प्रकल्प प्रगतिपथावर असून, या प्रकल्पांमुळे प्रवासी तसेच मालवाहतुकीस गती मिळून राज्याच्या आर्थिक विकासाला चालना मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
...
राज्यात दोन हायस्पीड कॉरिडॉर
या अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी दोन महत्त्वाच्या हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरची घोषणा करण्यात आली आहे. मुंबई-पुणे हायस्पीड कॉरिडॉरमुळे सध्या तीन ते चार तास लागणारा प्रवास अवघ्या ४८ मिनिटांत पूर्ण करता येणार आहे. तसेच पुणे-हैदराबाद प्रवासाचा कालावधी एक तास ५५ मिनिटांवर येणार असून, मुंबई ते हैदराबाद हे अंतर तीन तासांच्या आत पार करता येणार आहे. हे सर्व कॉरिडॉर ताशी ३५० किलोमीटर वेगासाठी डिझाइन करण्यात आले आहेत. देशभरात एकूण सात हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर प्रस्तावित असून, त्यांची एकूण लांबी सुमारे चार हजार किलोमीटर इतकी असेल. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांसाठी अंदाजे १६ लाख कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचेही वैष्णव यांनी सांगितले.
...
वाढवण बंदराला रेल्वे जोड
पूर्व-पश्चिम डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर प्रकल्पाचीही घोषणा करण्यात आली आहे. या मार्गामुळे महाराष्ट्रातील वाढवण बंदराला थेट रेल्वे जोड मिळणार असून, हे बंदर जागतिक पातळीवरील सर्वाधिक मोठ्या बंदरांपैकी एक ठरण्याची अपेक्षा आहे. या कनेक्टिव्हिटीमुळे महाराष्ट्रासह गुजरात, छत्तीसगड, मध्य प्रदेश, ओडिशा आणि पश्चिम बंगाल या राज्यांशी दळणवळण अधिक सुलभ होणार आहे.
...
१०० टक्के विद्युतीकरण पूर्ण
महाराष्ट्रात १०० टक्के रेल्वे विद्युतीकरण पूर्ण झाले असून, २०१४ नंतर ३,७४४ कोटी रुपयांचे विद्युतीकरणाचे काम करण्यात आले आहे. तसेच राज्यात आतापर्यंत १,२२८ उड्डाणपूल आणि अंडरपास बांधण्यात आले असून, त्यामुळे रस्ते वाहतुकीच्या सुरक्षिततेत लक्षणीय वाढ झाल्याचे वैष्णव यांनी सांगितले.
...
वंदे भारत, कवच...
राज्यात सध्या १२ जोड्या वंदे भारत आणि पाच जोड्या अमृत भारत गाड्या धावत असून, प्रवाशांना आधुनिक, वेगवान आणि सुरक्षित रेल्वे सेवा उपलब्ध होत आहे. रेल्वे सुरक्षेसाठी ‘कवच’ प्रणालीअंतर्गत महाराष्ट्रात आतापर्यंत ५७६ किलोमीटर मार्गावर कवच कार्यान्वित करण्यात आले आहे. ३,६१७ किलोमीटरवर काम सुरू असून, एकूण ४,९८१ किलोमीटरचे कवच प्रकल्प मंजूर झाले असल्याची माहितीही त्यांनी दिली. या सर्व तरतुदींमुळे महाराष्ट्रातील रेल्वे पायाभूत सुविधा अधिक सक्षम होऊन, राज्याच्या आर्थिक आणि औद्योगिक विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास रेल्वेमंत्र्यांनी व्यक्त केला.
...
अमृत भारत स्थानके
राज्यात अमृत भारत योजनेअंतर्गत १३२ रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाचे काम सुरू असून, त्यासाठी ५,६७५ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येत आहे. यापैकी १७ स्थानकांची कामे पूर्ण झाली असल्याची माहिती रेल्वेमंत्र्यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महिलांना ऑफिसमध्ये बोलवायचा, नंतर स्वत:चे मूत्र पाजून...; कॅप्टन खरातचा विकृतपणा वाचून तळपायाची आग मस्तकात जाईल

X Down: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' डाऊन! कोट्यवधी युजर्सना तांत्रिक अडचणींचा फटका

कोकणाला डावलून केंद्राचा यूपीला मान! दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद, दादर-गोरखपूर ट्रेन सुरू; वर्षानुवर्षांच्या मागणीवर पाणी

Baramati Vidhan Sabha: बारामती पोटनिवडणूक काँग्रेस लढवणार? शरद पवार गटाच्या भूमिकेवर केलं भाष्य

Malegaon Crime : राष्ट्रवादी कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; मारेकरी सीसीटीव्हीत कैद, आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु

SCROLL FOR NEXT