एपस्टीन फाइल्सप्रकरणी
युवक काँग्रेसचे आंदोलन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ ः एपस्टीन फाइल्स प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव असणे, हे भारतासाठी अत्यंत गंभीर आहे. या प्रकरणामुळे देशाची आंतरराष्ट्रीय प्रतिमा मलिन होत आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन यांनी केली. शबरीन यांच्या नेतृत्वात युवक काँग्रेसने मुंबईत निषेध आंदोलन केले.
एपस्टीन प्रकरणाचा वापर भारताच्या धोरणांवर दबाव आणण्यासाठी करण्यात आला होता का? पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या वैयक्तिक प्रतिमा आणि राजकीय अस्तित्वासाठी देशाच्या दीर्घकालीन धोरणात्मक हितांशी तडजोड करीत आहेत का, हा प्रश्न आज देशासमोर उभा आहे, असे शबरीन म्हणाल्या. या वेळी मुंबई युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष हुसेन शेख, पंकज चौधरी, सरचिटणीस अब्दुल समद, अजय मिश्रा, अमनदीप सैनी, तेजस चांदुरकर, दक्षिण मुंबई युवक जिल्हाध्यक्ष शेखर जगताप, दक्षिण मध्य मुंबई युवक जिल्हाध्यक्ष फरहान मन्सुरी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.