मुंबई

आविष्कार संशोधन स्पर्धेत मुंबई विद्यापीठ अव्वल

CD

आविष्कार संशोधन स्पर्धेत मुंबई विद्यापीठ अव्वल
१४ सुवर्ण, एक रौप्यसह पाच कांस्यपदकांची कमाई; सलग सातव्या वर्षी विजेतेपद

मुंबई, ता. २ : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथे २८ ते ३१ जानेवारीदरम्यान पार पडलेल्या १८व्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठीय आविष्कार संशोधन स्पर्धेमध्ये मुंबई विद्यापीठाने ८३ गुणांसह अंतिम विजेतेपद पटकावून प्रथम क्रमांक मिळवला आहे. या संशोधन महोत्सवामध्ये मुंबई विद्यापीठाने नेत्रदीपक कामगिरी करून १४ सुवर्ण, एक रौप्य आणि पाच कांस्यपदकांची कमाई करीत आविष्कार संशोधन स्पर्धेवर सलग सातव्या वर्षी विजयी मोहर उमटवली आहे.

लोक भवन आयोजित या संशोधन महोत्सवामध्ये महाराष्ट्र राज्यातील सर्व २४ विद्यापीठांनी सहभाग घेतला होता. प्रत्येक विद्यापीठ या स्पर्धेसाठी मानव्यविद्या, भाषा आणि कला; वाणिज्य व्यवस्थापन आणि विधी; मूलभूत शास्त्रे; शेती व पशुसंवर्धन; अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान आणि वैद्यक शास्त्र व औषधशास्त्र या प्रवर्गातून ४८ संशोधन प्रकल्प पाठविले जातात. मुंबई विद्यापीठाने या स्पर्धेसाठी ४८ संशोधन प्रकल्प सादर केले होते. यामध्ये ४८ पैकी २० संशोधन प्रकल्पांना पारितोषिके मिळाली. यामध्ये मुंबई विद्यापीठाने मानव्यविद्या, भाषा आणि ललित कला या प्रवर्गात तीन सुवर्ण आणि दोन कांस्य, वाणिज्य व्यवस्थापन आणि विधी या प्रवर्गात दोन सुवर्ण आणि एक कांस्य, मूलभूत शास्त्रे या प्रवर्गात तीन सुवर्ण आणि एक कांस्य, शेती व पशुसंवर्धन या प्रवर्गात एक सुवर्ण आणि एक कांस्य, अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान या प्रवर्गात दोन सुवर्ण, वैद्यकशास्त्र व औषधशास्त्र या प्रवर्गात तीन सुवर्ण, एक रौप्यपदक पटकावले आहे. या सहाही प्रवर्गांत गटनिहाय विजेतेपद प्राप्त केले आहे.

..
संशोधनाच्या क्षेत्रात मुंबई विद्यापीठाने सलग सातव्या वर्षी केलेली उज्ज्वल कामगिरी ही विद्यापीठाच्या शैक्षणिक परंपरेची सशक्त साक्ष आहे. विद्यार्थ्यांच्या संशोधन कल्पनांचे स्टार्ट-अपमध्ये रूपांतर होण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य विद्यापीठाकडून केले जात आहे.
- प्रा. रवींद्र कुलकर्णी, कुलगुरू, मुंबई विद्यापीठ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra School: महाराष्ट्रातील सर्वच शाळांमध्ये मराठी अनिवार्य! न शिकवल्यास मान्यता रद्द होणार; महायुती सरकारचा मोठा निर्णय

Gas Shortage: जेजेतील कॅन्टीन सेवेला गॅसटंचाईचा फटका; विद्यार्थी, डॉक्टर, रुग्णांच्या नातेवाइकांना त्रास

सिलिंडरसाठी रांगेत असताना हृदयविकाराचा तीव्र झटका, ६६ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, कुटुंबियांकडून आर्थिक मदतीची मागणी...

काव्या मारनच्या संघाने पाकिस्तानी अबरार अहमदला करारबद्ध केले... BCCI ने दिली प्रतिक्रिया; म्हणतात, आमचा काही संबंध नाही

Latest Marathi News Live Update : नगर-श्रीगोंदा मार्गांवर तेल वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात

SCROLL FOR NEXT