मुंबई

कुर्ला परिसरात गर्दुल्यांचा सुळसुळाट; रहिवाशी त्रस्त

CD

कुर्ला परिसरात गर्दुल्ल्यांचा सुळसुळाट; रहिवासी त्रस्त
तत्काळ कडक बंदोबस्ताची मागणी
चेंबूर, ता. २ (बातमीदार) : कुर्ला येथील शीतल तलाव आणि संदेश नगर परिसर सध्या गर्दुल्ल्यांचा अड्डा बनल्याने स्थानिक रहिवाशांमध्ये तीव्र अस्वस्थता पसरली आहे. परिसरातील काही मार्गांवर तळीराम खुलेआम मद्यपान करत बसत असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
पालिकेने काही वर्षांपूर्वी शीतल तलावाचे सुशोभीकरण केले होते. मात्र, सध्या तलावाच्या परिसरात गर्दुल्ल्यांनी ठाण मांडल्याचे चित्र आहे. तसेच संदेश नगर परिसरात मिठी नदीजवळ अंधाराचा फायदा घेत मद्यपान सुरू असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.
याच परिसरातील एका वाइन्स दुकानासमोरील मार्गावर राजरोसपणे मद्यपान होत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. संदेश नगर परिसरात काही वर्षांपूर्वी एका तरुणीवर चार-पाच जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली होती. अशा घटनेची पुनरावृत्ती होण्याची भीती स्थानिक रहिवाशांकडून व्यक्त केली जात आहे. ‘‘एखादी गंभीर घटना घडल्यावरच पोलिस प्रशासन जागे होणार का,’’ असा सवाल रहिवाशांनी उपस्थित केला आहे. याबाबत वारंवार तक्रारी करूनही पोलिस प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. या परिसरात तातडीने कडक पोलीस बंदोबस्त ठेवावा आणि गर्दुल्ल्यांचा त्वरित बंदोबस्त करावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिक रहिवाशांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT