मुंबई

गावठी कोंबड्यांना सोन्याचा भाव

CD

गावठी कोंबड्यांना सोन्याचा भाव
वाढत्या मागणीमुळे किमती ८०० रुपयांच्या पार
टोकावडे, ता. ३ (बातमीदार) : चविष्ट आणि लज्जतदार गावरान रस्सा खाण्याची हौस पूर्ण करण्यासाठी खवय्यांची पावले आता थेट आदिवासी वाड्या-वस्त्यांकडे वळत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात गावठी कोंबड्यांच्या मागणीत सध्या मोठी वाढ झाली असून, तुटवड्यामुळे त्यांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. सद्यस्थितीत एका गावठी कोंबड्यांसाठी खवय्यांना ७०० ते ८०० रुपये मोजावे लागत आहेत.

आजकाल व्यापारी तत्त्वावर सोनाली, वनराज, कडकनाथ यांसारख्या विविध जातींच्या कोंबड्यांचे पालन केले जात असले, तरी अस्सल गावठी कोंबड्यांची चव वेगळीच असल्याचे खवय्यांचे मत आहे. मोकळ्या वातावरणात नैसर्गिक अन्नावर वाढलेल्या या कोंबड्यांना सर्वाधिक पसंती दिली जात आहे. मात्र, मागणीच्या तुलनेत उपलब्धता कमी असल्याने ग्राहकांना अनेकदा रिकाम्या हाताने परतावे लागत आहे.

उत्पन्नाचा स्रोत
गावठी कोंबडी पालन हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो. नैसर्गिक खाद्य आणि घरगुती अन्नावर वाढ होत असल्याने वेगळ्या खाद्यखर्चाची गरज भासत नाही. या कोंबड्यांची प्रतिकारशक्ती चांगली असल्याने औषधांचा खर्चही वाचतो. अनेक शेतकरी, महिला बचत गट आणि आदिवासी कुटुंबे या व्यवसायाकडे उत्पन्नाचा प्रमुख स्रोत म्हणून पाहू लागली आहेत. ग्रामीण भागात देव-देवतांचा नवस फेडण्यासाठी, जत्रा, यात्रा आणि पारंपरिक विधींमध्ये केवळ गावठी कोंबड्यांचाच वापर केला जातो. सणासुदीच्या काळात ही मागणी अधिकच वाढते, ज्यामुळे दर आणखीनच कडाडतात.

शेतकरी पुन्हा कुक्कुटपालनाकडे
बदलती जीवनशैली आणि स्थलांतरामुळे मध्यंतरी गावठी कोंबड्यांचे प्रमाण कमी झाले होते. मात्र, आता मिळणारा चांगला नफा आणि वाढती मागणी पाहून अनेक शेतकरी पुन्हा एकदा जोमाने गावठी कोंबडी पालनाकडे वळताना दिसत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DGGIचा कारभार विकृत आणि मनमानी! कारवाई रद्द करा अन् जप्त रोकड व्याजासह परत द्या; मुंबई हायकोर्टानं फटकारलं

Latur Highway Safety Issue: किल्लारी राष्ट्रीय महामार्गावर अपघाताचा धोका वाढला; संरक्षणभिंत व पथदिव्यांची नागरिकांची मागणी

Nashik News : सिलिंडरबाबत अफवा पसरवाल तर सावधान! नाशिक प्रशासनाचा कडक कारवाईचा इशारा

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये गॅस मिळवण्यासाठी नागरिकांच्या लागल्या रांगा

लव्ह बर्ड.. मांजर अन् कोयत्याने वार ! पुण्यात शेजाऱ्यांमध्ये जुंपली, प्रकरण पोलीस ठाण्यात; बातमी वाचून डोक्यावर माराल हात

SCROLL FOR NEXT