मुंबई

पान ३ पट्टा

CD

कोकणपाडा शाळेचे घवघवीत यश
विक्रमगड (बातमीदार)ः पंचायत समिती विक्रमगड सभागृह येथे तालुकास्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धात जिल्हा परिषद सेमी इंग्रजी प्राथमिक शाळा कोकणपाडा (आलोंडे) या शाळेने नाट्य स्पर्धेमध्ये ‘माझी तंबाखूमुक्त शाळा व नशा मुक्त शाळा’ या विषयावर आधारित उत्कृष्ट नाटिका सादर करून तालुक्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. शाळेची विद्यार्थिनी कुमारी वैदेही विनोद डोहाळे इयत्ता चौथी हिने वक्तृत्व स्पर्धेत ‘वृक्ष माझा सखा’ विषयावर मौलिक विचार परखड व सहज सोप्या भाषेत मांडून तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. २० वर्षांपासून नाट्य व वक्तृत्व स्पर्धांत यशाची शाळेने चालविलेली परंपरा सुरूच ठेवली आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल शाळेचे मुख्याध्यापक दशरथ गवळी, सहशिक्षिका विनया डोहाळे, शाळा व्यवस्थापन समिती, पालक वर्ग, ग्रामस्थ, माजी विद्यार्थी संघ यांच्याकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
ः-----------------------------
डॉ.नीलेश राऊत यांचा सन्मान
पालघर(बातमीदार)ः ममता, विसावा, वात्सल्य समन्वय समितीच्यावतीने महिन्याच्या शेवटी सदस्यांचे वाढदिवस साजरे केले जातात. गेली अनेक वर्षे सातत्याने नागरिक संघ आणि समन्वय समिती विविध उपक्रम राबवित असते. याच अनुषंगाने पालघर येथे ज्येष्ठ नागरिक भवनात सामाजिक कार्यकर्ते ॲड डॉ. निलेश राऊत यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी सामाजिक कार्यातील उल्लेखनीय कामगिरीसाठी सत्कार करण्यात आला. संस्थेचे अध्यक्षभगवान पामाले यांनी ज्येष्ठांची भावना ओळखून स्वतः सदस्य होऊन नेहमी जेष्ठ नागरिकांना मदत करीत असतात. पण एक युवा कार्यकर्ता स्वतः पुढे होऊन काम अशा प्रकारे मदत करतो, तोच खरा कार्यकर्ता असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. यावेळी संस्थेचे सचिव नरेंद्र पाटील, खजिनदार प्रकाश पाटील यासह अनेक ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.
़ः-----------------------------------
शिक्षणाचे महत्त्व या विषयावर मार्गदर्शन शिबीर
भाईंदर (बातमीदार) : स्तंभ फाउंडेशनच्यावतीने दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘शिक्षणाचे महत्त्व’ या विषयावर विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे रविवारी (ता.१) भाईंदर येथे आले होते. आगामी परीक्षांची तयारी, वेळेचे योग्य नियोजन व ध्येय निश्चिती याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे, हा कार्यक्रमाचा हेतू होता. विद्यार्थ्यांना परीक्षेची प्रभावी तयारी कशी करावी तसेच वेळेचे नियोजन कसे करावे याबाबत प्रकाश जालुका यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. नियमित अभ्यास, शिस्त व सकारात्मक दृष्टिकोन यांचे महत्त्व त्यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अनिल मलरेचा यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणा देत शिक्षण हेच यशाचे खरे साधन असल्याचा सल्ला देऊन चिकाटीने प्रयत्न केल्यास यश निश्चित मिळते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी सीमा रावल यांनी शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले.
़़़़़़़़़़़़़़़ः--------------------------------------
सहकारी पतसंस्थेची विक्रमगडमध्ये शाखा
विक्रमगड (बातमीदार)ः वाडा नागरी सहकारी पतसंस्था लि. वाडा विक्रमगड येथील नवीन शाखेचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले. या कार्यक्रमाला शिरीष कुलकर्णी (जिल्हा उपनिबंधक), आनंद दळवी (जिल्हा विशेष लेखापरीक्षक), चंद्रकांत विघ्ने (वाडा तालुका सहनिबंधक), श्री. भडांगे (सहनिबंधक विक्रमगड तालुका), विश्वनाथ पाटील (कुणबी सेना प्रमुख), दिलीप दत्तात्रय म्हात्रे (संस्थापक अध्यक्ष वाडा नागरी सहकारी पतसंस्था), पुंडलिक भानुशाली (भाजपा जिल्हा प्रसिद्धी प्रमुख), मंगेश औसरकर, महेश आळशी, सचिन शिंगडा, महालक्ष्मी ज्वेलर्सचे आदिनाथ कचरे, वाडा नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक मंडळ उपस्थित होते. विक्रमगड शाखेचे व्यवस्थापक महेश पांडव यांनी पतसंस्थेबद्दल सविस्तर माहिती दिली. तसेच आगामी काळात पतसंस्थेमार्फत होणाऱ्या विविध सामाजिक कार्यांची माहिती दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महिलांना ऑफिसमध्ये बोलवायचा, नंतर स्वत:चे मूत्र पाजून...; कॅप्टन खरातचा विकृतपणा वाचून तळपायाची आग मस्तकात जाईल

X Down: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' डाऊन! कोट्यवधी युजर्सना तांत्रिक अडचणींचा फटका

कोकणाला डावलून केंद्राचा यूपीला मान! दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद, दादर-गोरखपूर ट्रेन सुरू; वर्षानुवर्षांच्या मागणीवर पाणी

Baramati Vidhan Sabha: बारामती पोटनिवडणूक काँग्रेस लढवणार? शरद पवार गटाच्या भूमिकेवर केलं भाष्य

Malegaon Crime : राष्ट्रवादी कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; मारेकरी सीसीटीव्हीत कैद, आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु

SCROLL FOR NEXT