मुंबई

मुरबेत वासराची बिबट्याकडून शिकार

CD

मुरबेत वासराची बिबट्याकडून शिकार
तारापूर, ता. ३ (बातमीदार)ः मुरबेजवळील मोरोडी परिसरात गोठ्यातील वासरावर हल्ला करून ठार मारल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली. पाळीव जनावरांवरील सततच्या हल्ल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये दहशत पसरली आहे.
तारापूर बोईसर परिसरात मागील तीन वर्षांपासून बिबट्याचा वावर सुरू आहे. तारापूर अणुऊर्जा प्रकल्प, मोगरबाव, नेवाळे, राणीशीगाव, कुडण, कुरगाव, दहिसर तर्फे तारापूर परिसरात बिबट्याचे दर्शन होत असून, भटके श्वान, शेळी, मांजर,कोंबड्या, पाळीव गुरे यांच्यावर हल्ला करून शिकारीच्या घटना घडत आहेत. काही दिवसांपूर्वी नांदगावच्या भाट आळी परिसरात बिबट्याच्या पाऊलखुणा आढळल्या होत्या. त्यामुळे बिबट्याचा वावर असल्यामुळे पशुधनाच्या काळजीने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.
----------------------
वन विभाग सतर्क
बोईसर वन परिक्षेत्र कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी बिबट्याचा संचार असलेल्या भागात कॅमेरा लावले असून, बिबट्याचा नेमका माग काढण्याचा प्रयत्न सुरू आहेत, पण नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: मुंबई-ठाणे-कल्याण प्रवास सुसाट होणार! खाली रस्ता, मध्यभागी उड्डाणपूल आणि वर मेट्रो धावणार, जाणून घ्या संपूर्ण प्लॅन

T20 WC, IND vs ENG SF: भारत-इंग्लंड सामन्यासाठी वानखेडेवरील '७' नंबरची खेळपट्टी वापरली जाणार; २४ तासांत फिरला गेम... स्टेडियमवरून ताजे अपडेट्स

Latest Marathi News Live Update : एसटी चालक आणि वाहकांची अल्कोहोल तपासणी बंधनकारक

Kolhapur Wrestling : कोल्हापूरच्या मातीचा गाजणार पुन्हा एकदा जलवा; कुंभी कारखान्याच्या कुस्ती स्पर्धेत ५०० हून अधिक पैलवान उतरणार आखाड्यात

Beed News : गांजा तस्करीचे मोठे रॅकेट उघड? बर्दापूर पोलिसांची मोठी कामगिरी; मूर्ती फाट्याजवळ १० लाख ८०० रुपयांचा मुद्देमाल पकडला, तिघांना बेड्या

SCROLL FOR NEXT