मुंबई

संत रोहीदास यांचे कार्य महाराष्ट्रात वारकरी संप्रदाय पुढे नेत आहे

CD

संत रोहिदास यांचे कार्य महाराष्ट्रात वारकरी संप्रदाय पुढे नेत आहे : हभप शिवाजीमहाराज मोरे
मुंबई, ता. ५ : संत रोहिदास महाराज यांनी दिलेला भक्ती, समता आणि मानवतेचा संदेश महाराष्ट्रात वारकरी संप्रदाय खऱ्या अर्थाने पुढे नेत असल्याचे प्रतिपादन संत तुकाराम महाराजांचे वंशज हभप शिवाजीमहाराज मोरे यांनी केले. माघ पौर्णिमेनिमित्त रविवारी (ता. १) दादर येथील राजा शिवाजी विद्यालयाच्या पटांगणात आयोजित संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या ६५०व्या जयंती समारोहाच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते.
या सोहळ्यास मुख्यमंत्र्यांचे प्रतिनिधी म्हणून मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, विश्व हिंदू परिषदेचे सह महासचिव स्वामी विज्ञानानंद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुंबई महानगर सह संघचालक प्रा. डॉ. विष्णू वझे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
हभप शिवाजीमहाराज मोरे यांनी सांगितले, की संत रोहिदास महाराजांनी संत तुकाराम महाराजांप्रमाणेच भक्तिमार्गासोबत समानता, पर्यावरण संरक्षण आणि संस्कृती जपण्याचा संदेश समाजाला दिला.
या वेळी बोलताना प्रा. डॉ. विष्णू वझे म्हणाले, की संत रोहिदास यांच्यासारख्या संतांनी उभ्या केलेल्या भक्ती संप्रदायामुळे भारताचा धर्म व संस्कृती जिवंत राहिली. मूळ भारतीय संस्कृतीत अस्पृश्यतेला स्थान नव्हते; मात्र परकीय आक्रमणांच्या दुष्परिणामांमुळे काही विकृती परंपरेत शिरल्या, ज्याविरोधात संतांनी संघर्ष केला, याची त्यांनी आठवण करून दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्ञानेश्वर ठोंबरे यांनी केले. सूत्रसंचालन तेजस्विनी मुंढे यांनी तर आभार प्रदर्शन गुरुदेव कांबळे यांनी केले. विजय इंगळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे चर्मकार समाजाच्या शिष्टमंडळाने सादर केलेल्या मागण्यांची माहिती उपस्थितांना दिली. या वेळी माजी राज्यमंत्री भाई गिरकर, माजी आमदार बाबूराव माने, सहाय्यक पोलिस आयुक्त रवींद्र डोईफोडे, रवींद्र पेवेकर, धनंजय वायंगणकर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमात स्वा. सावरकरलिखित संत रोहिदास गीत गायिका रोशनी मालांडकर यांनी सादर केले. सांस्कृतिक कार्यक्रमांत शाहीर यशवंत जाधव आणि शाहीर दत्ता राम म्हात्रे यांनी शाहिरी व पोवाड्यांचे सादरीकरण केले. तसेच पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते संत रोहिदास महाराजांच्या जीवनावर आधारित चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वाघ किंवा बिबट्या गावात येताच मोबाईलवर येणार अलर्ट; नागपुरात नवी यंत्रणा सुरू, AI हिंस्त्र प्राण्यांचा धोका कसा ओळखणार?

IPL 2026 Marathi News: गतविजेत्या RCB ला स्पर्धा सुरू होण्यापूर्वी झटका! प्रमुख खेळाडूच्या खेळण्यावर अनिश्चिततेचे सावट

Gas Shortage: हॉटेल व्यावसायिकांसाठी मोठा निर्णय! कमर्शियल सिलिंडरचा कोटा २० टक्के, पण 'यांनाच' मिळेल गॅस

EPFO PF Account: नोकरी बदलली? जुन्या PF खात्यातील पैशांची चिंता करू नका; ‘फॉर्म 13’ करेल सगळी मदत

राज्य शालेय पोषण आहाराची परदेशात तस्करी? सीआयडीमार्फत चौकशीची मागणी, प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT