मुंबई

भिवंडीतील श्वान निर्बीजीकरण संथ गतीने,

CD

श्वान निर्बीजीकरण संथ गतीने
भिवंडीतील शहरातील श्वानांची दहशत कायम
भिवंडी, ता. २ (वार्ताहर) ः भिवंडी शहरात बारावर्षीय मुलाचा श्वानदशांमुळे मृत्यू झाल्याने भिवंडी शहरातील भटक्या श्वानांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. भिवंडी पालिका क्षेत्रात व नजीकच्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर भटक्या श्वानांनी उच्छाद मांडला आहे. यामुळे श्वानदंशाच्या घटनासुद्धा वाढल्या आहेत. त्यांचा बंदोबस्त करण्यात पालिका प्रशासनाच्या आरोग्य विभागास अपयश आले आहे. यामुळे शहरातील नागरिकांमध्ये विशेषतः लहान मुलांमध्ये भटक्या श्वानांची दहशत कायम आहे.
पालिका प्रशासनाने भटक्या श्वानांचा बंदोबस्त करण्यासाठी बारा वर्षांपासून बंद असलेले श्वान निर्बीजीकरण केंद्र ११ नोव्हेंबर २०२४ मध्ये पुन्हा नव्याने सुरू केले. याचे काम व्हेट्स सोसायटी फॉर ॲनिमल वेल्फेअर ॲण्ड रुरल डेव्हलपमेंट या संस्थेस सोपवले असून, त्यासाठी प्रति श्वानाच्या नसबंदीवर एक हजार ४४० रुपये दिले जातात. शहरात साधारण २४ हजार भटके कुत्रे असून, आजपर्यंत अवघ्या सहा हजार १३६ श्वानांचे लसीकरण व निर्बीजीकरण करण्यात आले आहे. ही संख्या एकूण संख्येच्या प्रमाणात अत्यल्प असून, नसबंदी केलेल्या श्वानांचे कान कापले जातात. परंतु, ते कान छोट्या प्रमाणात कापले जात असल्याने नसबंदी झालेल्या श्वानांची ओळख पटत नसल्याचे सांगितले जात आहे. यामुळे नक्की श्वानदंश कोणत्या श्वानाने केला, हे ओळखणे जिकिरीचे झाले आहे. शहरातील भटक्या श्वानांचा पालिकेने तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिक करत आहेत.

लसीची उपलब्धता
इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयात ११ हजार ३७ तर पालिका बीजीपी दवाखाना येथे १ एप्रिल २०२५ ते जानेवारी २०२६ दरम्यान सहा हजार १३६ रुग्णांवर श्वानदशांवर प्रभावी ॲण्टीरेबीज व्हॅक्सिन ही लस देण्यात आली आहे. पालिकेकडे पुरेसा लसीचा साठा उपलब्ध असून, इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयास लसपुरवठा पालिका आरोग्य विभागाने केला आहे, अशी माहिती पालिका वैद्यकीय आरोग्य विभागाचे मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. संदीप गाडेकर यांनी दिली आहे.

हॉटस्पॉट ठरलेले भाग
शहरातील ईदगाह, शांतीनगर, कामतघर, नागाव गायत्रीनगर, निजामपूर आणि कोंबडपाडा या भागात भटक्या श्वानांची संख्या मोठी आहे. पालिका प्रशासन या श्वानांचा बंदोबस्त करण्यात अपुरी ठरल्याने विशेषतः लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे.

घटक आकडेवारी
शहरातील एकूण भटके श्वान (अंदाजे) २४,०००
आतापर्यंत झालेले निर्बीजीकरण ६,१३६
निर्बीजीकरण बाकी असलेले श्वान १७,८६४
प्रति श्वान निर्बीजीकरण खर्च १,४४०

श्वानदंशप्रसंगी घ्यावयाची काळजी
श्वानदंशामध्ये मानेवरील जखम ही गंभीर स्वरूपाची म्हणून ओळखली जाते, परंतु त्याखालील श्वानदंश हा कमी जोखमीचा असतो. त्यामुळे श्वानदंश झाल्यानंतर सर्वप्रथम त्वरित १० मिनिटे जखम स्वच्छ पाण्याने धुवून त्यावर अँटिसेप्टीक मलम लावावे, जेणेकरून रेबीज जंतूंचा प्रभाव कमी होतो. अशा रुग्णांना त्वरित रुग्णालयात दाखल करावे व पुढील तीन दिवसांच्या टप्प्याटप्प्याने लसीचे एकूण चार डोस घेणे बंधनकारक आहे. यामुळे श्वानदंशाची दाहकता कमी करता येऊ शकते, अशी माहिती संदीप गाडेकर यांनी दिली आहे.

फोटो - संदीप गाडेकर मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल महागणार नाही; भारत सरकारचा मोठा निर्णय, तेल कंपन्यांची नवी रणनीती काय?

Iran Attack: आखाती देशांवर इराणचे हल्ले; अमेरिका, इस्राईलकडून इराणच्या शिराझ शहरावर ड्रोनचा मारा, नेतान्याहू यांना मारण्याची शपथ!

Dhangar Reservation: धनगर आरक्षणासाठी आझाद मैदानावर उद्यापासून उपोषण; सकाळी दहापासून उपाेषण, आंदोलक मुंबईकडे रवाना!

बीड अल्पवयीन विवाहितेच्या अत्याचार प्रकरणाला वेगळं वळण, पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावर गुन्हा दाखल होणार

Prakash Abitkar: ‘रेबीज’विरोधी लशींचा पुरेसा साठा: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर; सरकारी, महापालिका रुग्णालयांमध्ये पुरवठा नियमित!

SCROLL FOR NEXT