मुंबई

महापालिकेची मोकळी जागा विकसकाने बळकावली ?

CD

टिटवाळ्यात विकासकाची दादागिरी
महापालिकेच्या जागेवर बेकायदा ‘सेल्स ऑफिस’
टिटवाळा, ता. ३ (वार्ताहर) : मांडा-टिटवाळा पश्चिम येथील वासुंद्री रोडवर एका नामांकित बांधकाम व्यावसायिकाने चक्क महापालिकेच्या मालकीच्या मोकळ्या जागेवर डल्ला मारला आहे. पंचवटी चौक परिसरात कायद्याला हरताळ फासत, या जागेवर कंटेनर उभा करून त्याचे अनधिकृत ‘सेल्स ऑफिस’ सुरू केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

मंगलमय सोसायटीच्या गेट शेजारीच हा प्रकार सुरू आहे. महापालिकेच्या ताब्यात असलेली ही जागा सार्वजनिक वापरासाठी राखीव असताना, तिथे कोणतीही परवानगी न घेता मोठा कंटेनर ठेवण्यात आला आहे. या कंटेनरला आकर्षक बॅनर आणि रोषणाई करून तिथे फ्लॅट विक्रीचे व्यवहार उघडपणे सुरू आहेत. प्रशासकीय डोळेझाक आणि विकसकाचे नियोजनबद्ध पाऊल यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे. या जागेचे महत्त्व स्थानिक नागरिकांसाठी मोठे आहे. याच पंचवटी चौकात संत ज्ञानेश्वर महाराजांचे मंदिर असून, तिथे दरवर्षी कीर्तन सप्ताह व सांस्कृतिक कार्यक्रम होतात.

मांडा पश्चिमेकडील ही एकमेव मोकळी जागा असल्याने संध्याकाळी ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुले येथे फेरफटका मारण्यासाठी येतात. बेकायदेशीर ऑफिसमुळे रहदारीला अडथळा निर्माण होत असून, अपघाताची टांगती तलवार आहे. प्रशासन या विकसकाच्या दबावाखाली आहे की जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे, असा संशय आता बळावला आहे. याप्रकरणी तातडीने कारवाई करून महापालिकेची जागा मुक्त करण्याची मागणी रहिवाशांनी केली आहे. वर्दळीच्या ठिकाणी हा प्रकार अनेक दिवसांपासून सुरू असतानाही महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने अद्याप साधी नोटीसही बजावलेली नाही. ‘‘नियम फक्त गरिबांच्या टपऱ्यांसाठीच आहेत का,’’ असा सवाल आता विचारला जात आहे.

सुरक्षिततेचा प्रश्न
बेकायदेशीर सेल्स ऑफिसमुळे रस्त्यालगतची जागा अडवल्याने वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच आपत्कालीन परिस्थितीत या ठिकाणी मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे तत्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

प्रशासनाकडून लवकरच कर्मचारी त्या ठिकाणी पाठवून प्रत्यक्ष पाहणी करण्यात येईल. तसेच सार्वजनिक ठिकाणी कुठल्याही प्रकारचे बेकायदेशीर बांधकाम आढळून आल्यास नियमांनुसार तातडीने कठोर कारवाई करण्यात येईल.
- जयवंत चौधरी, सहायक आयुक्त, प्रभाग अ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Dudh Sangh : कोल्हापूर जिल्ह्याचे सहकार सत्ता केंद्र,‘गोकुळ’च्या निवडणुकीचे बिगुल पुढील आठवड्यात; अंतर्गत हालचालींना वेग

Mamata Banerjee: जिवंत लोक ‘मृत’ दाखवले? CJI सूर्यकांत यांच्यासमोर ममता बॅनर्जी आक्रमक; निवडणूक आयोगाला सुप्रीम कोर्टाची नोटीस

Gold Extraction from SIM Card : पठ्ठ्याने जुन्या सिमकार्डसमधून काढले २६ लाखांचे सोने, व्हिडिओ केला शेअर, लोक म्हणाले- हा तर आधुनिक किमयागार

''प्राची बॉस होती, निशिका-पाखी तिचं ऐकायच्या, रात्री २ वाजता त्यांनी...''; तीन बहिणींनी जीवन संपवल्याप्रकरणी वडिलांचा धक्कादायक खुलासा!

Latest Marathi News Live Update : काय पाणी मुरतय ते बघाव लागेल; अजितदादांच्या अपघात प्रकरणी गोगावलेंनी व्यक्त केला संशय

SCROLL FOR NEXT