मुंबई

उल्हासनगरात शासनाचा गहू काळ्या बाजारात, दोन आरोपी जाळ्यात

CD

उल्हासनगरात रेशनच्या गव्हाचा काळाबाजार
दोन आरोपी अटकेत
उल्हासनगर, ता. ३ (वार्ताहर) : शहरातील रेशनच्या गव्हाचा काळाबाजार होत असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. प्रशासनाने तातडीची कारवाई करत दोन जणांविरोधात जीवनावश्यक वस्तू कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई उल्हासनगर-४ येथील बॅरेक क्रमांक १६१८, रूम नंबर ७, सेक्शन २८ या ठिकाणी करण्यात आली. या प्रकरणातील आरोपी संजय रोहिडा (वय ५५ वर्षे) आणि संतोष रोहिडा (वय २८ वर्षे) अशी असून, दोघेही उल्हासनगर-४ येथील रहिवासी आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, संजय रोहिडा आणि संतोष रोहिडा यांनी शासनाच्या गव्हाच्या मूळ गोण्या बदलून त्या बोलोरो पिकअप वाहनामध्ये भरल्या आणि त्याची अनधिकृतपणे साठवणूक केली होती. हा साठा काळ्याबाजारात विक्री करण्याचा त्यांचा उद्देश असल्याचे तपासात निष्पन्न झाले. या गंभीर प्रकाराबाबत शिधावाटप अधिकारी ज्योती तांबेकर यांनी विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
फिर्यादीच्या आधारे संजय रोहिडा आणि संतोष रोहिडा यांच्याविरोधात जीवनावश्यक वस्तू कायदा व महाराष्ट्र फूडग्रेन्स रेशनिंग ऑर्डरमधील तरतुदींचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या गैरव्यवहारामागे आणखी कोण सहभागी आहेत का, याचा शोध घेण्यासाठी तपास यंत्रणांनी कसून चौकशी सुरू केली आहे. या घटनेमुळे गरीब व गरजू लाभार्थ्यांच्या हक्काच्या अन्नधान्याच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, अशा प्रकारांवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi Update : राज्यात मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भात पावसाची शक्यता

Odisha Tragedy : ओडिशात मोठी दुर्घटना ! रुग्णालयाला भीषण आग; ICU मधील १० रुग्णांचा गुदमरुन मृत्यू

'फक्त ब्रा घालून किसिंग सीन करायला लावायचे' अभिनेत्रीने केली प्रसिद्ध दिग्दर्शकाची पोलखोल, म्हणाली, 'प्रत्येक सीनमध्ये इंटिमेन्सी..'

Dubai Airport Drone Attack : दुबई विमानतळावर इराणचा ड्रोन हल्ला ! आकाशात धुराचे लोट, विमानसेवा विस्कळीत

Pune News : ‘मसाप’मध्ये दहा वर्षांनी सत्तापालट

SCROLL FOR NEXT