मुरबाडच्या आंब्यावर ‘ढगाळ’ सावट
उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता ः शेकतरीवर्ग चिंतेत
मुरबाड, ता. ३ (बातमीदार) ः तालुक्यात मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. याचा फटका आंब्याच्या मोहोराला बसत असून, मोहोर गळून पडत असल्याने यंदा आंबा उत्पादनात मोठी घट होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे शेतकरीवर्गात चिंतेचे वातावरण आहे.
मुरबाड तालुक्यात स्थानिक व हापूस अशा दोन्ही प्रकारच्या आंब्याची झाडे मोठ्या प्रमाणावर आहेत. या झाडांना दरवर्षी शिवरात्रीच्या सुमारास मोहोर येतो. यावर्षी शिवरात्रीच्या अगोदरच गावठी व हापूस अशा दोन्ही आंब्यांची झाडे मोहोराने बहरली आहेत. यामुळे यंदा मोठे उत्पादन मिळेल या आशेने शेतकरीवर्गात आनंदाचे वातावरण होते. परंतु, मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरण होत असल्याने आंब्याचा मोहोर लालसर पडत असून, हळूहळू गळून पडत आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याची भावना शेकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.
फोटो ओळी
मुरबाड ः आंब्याच्या झाडाला आलेला मोहोर लालसर पडून गळत चालला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.