विवाहित महिला मोखाड्यातून बेपत्ता
मोखाडा, ता. ३ (बातमीदार) ः मोखाडा तालुक्यातील गोंदे बुद्रुक येथील रांजणपाडा परिसरातून लीला हडळ (वय २६) ही विवाहिता बेपत्ता आहे. याप्रकरणी मोखाडा पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आला आहे.
मोखाड्यातील गंगाराम हडळ ४ जूनला सकाळी ६ वाजता नाशिक येथे मजुरीसाठी गेले होते. त्यांची पत्नी लीला हडळ आई-वडील, मुलांसह घरीच होती. दिवसभर काम करून सायंकाळी घरी परतल्यानंतर पत्नी घरी नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. याबाबत विचारणा केली असता, सकाळी दवाखान्यात जाते, असे सांगून घरातून निघून गेल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली; मात्र रात्रीपर्यंत पत्नी घरी परतली नसल्याने कुटुंबीयांनी नातेवाईक, मैत्रिणी तसेच आजूबाजूच्या गावांत शोध घेतला. अद्याप तिचा थांगपत्ता लागलेला नाही. त्यामुळे याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.