मुंबई

ठाणे थोडक्यात बातम्या

CD

ठाणे थोडक्यात बातम्या

वागळे इस्टेटमध्ये घरफोडी

ठाणे : वागळे इस्टेट परिसरातील रामचंद्रनगर येथे राहणाऱ्या आशुतोष सिंह (वय २५) यांच्या घरातून चोरट्याने दोन महागडे मोबाईल फोन व १० हजार रुपयांची रोख रक्कम असा दीड लाखांचा ऐवज चोरी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. ही घटना रविवारी (ता. १) घडली असून घराचा दरवाजा उघडा असल्याचा फायदा घेत चोरट्याने घरात प्रवेश केला असावा, असे म्हटले आहे. याप्रकरणी वागळे इस्टेट पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.
.............

अल्पवयीन मुलगी बेपत्ता

ठाणे : बाहेर जाऊन येते, असे सांगून गेलेली दिव्यातील १७ वर्षीय मुलगी घरी परतली नाही. तिला कोणीतरी पळवून नेल्याप्रकरणी मुंब्रा पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना रविवारी (ता. १) रात्री ९.४५ वाजण्याच्या सुमारास घडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आल्याची माहिती मुंब्रा पोलिसांनी दिली.
...........

दुचाकी चोरली

ठाणे : दुकानामध्ये बिल घेण्यासाठी जाताना, दुचाकीला चावी राहिल्याने चोरट्याने त्याच संधीचा फायदा उचलून दुचाकी लांबवली आहे. ही घटना शनिवारी (ता. ३१) दुपारी शिळ-महापे रोडवरील घडली असून याप्रकरणी दिवा येथे राहणाऱ्या रोशन परब याने डायघर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. चोरीला गेलेल्या दुचाकीची किंमत ७० हजार रुपये असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
............

घरातील चोरीबाबत नातेवाईकांवर संशय

ठाणे : मुंब्रा, आनंद कोळीवाडा परिसरात घरातून २५ हजार रुपयांची रोख रक्कम असलेली पर्स चोरीस गेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी तक्रारदार आमिना समीर सय्यद (२६) या महिलेने तिच्या वहिनीसह तिच्या आईवर संशय व्यक्त केल्याने दोघींविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार २० जानेवारीला रात्री ९ ते ११.५० वाजण्याच्या सुमारास घडल्याचे तक्रारीत नमूद असून त्या वेळी त्यांच्या घरी आलेली वहिनी अलिना अब्दुला सल्फी व तिची आई गौसिया या दोघी हॉलमध्ये बसल्या होत्या. त्याचदरम्यान ही चोरी झाली असून आजारपणामुळे उशिराने तक्रार दाखल केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. मुंब्रा पोलिस पुढील तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harish Rana Case: हरिश राणाच्या इच्छामरणासाठी १३ वर्षे का लागली? कायदा, कोर्ट आणि वेदनेची पूर्ण कहाणी; ही पहिलीच केस नाही तर…

UPSC Fake Rank Case : युपीएससी उत्तीर्ण तरुणाचा आमदार अन् पोलिसांनी केला सत्कार; सत्य समजताच सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकली

Indian Women Hockey: पात्रता मिळवली, आता लक्ष्य विजेतेपदाचे; भारतीय महिला हॉकी संघाचा आज इटलीविरुद्ध उपांत्य सामना

Viral Video: व्हायरल होण्यासाठी वादग्रस्त कृत्य! चेंबूरमध्ये आगरी-कोळी परंपरेचा अपमान, व्हिडिओनंतर उसळला संताप

'मी तिला किस करणार नाही' संजय दत्तने 'या' अभिनेत्रीसोबत किसिंग सीन करण्यास दिलेला नकार, म्हणालेला...'तिला मी...'

SCROLL FOR NEXT