मुंबई

जिल्ह्याभरात काळी फित आंदोलन

CD

जिल्ह्याभरात काळी फित आंदोलन
- प्रलंबित मागण्यांसाठी सात हजार अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सहभाग

ठाणे, ता. ३ (बातमीदार) : महिला व बालविकास विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्ह्याभरात कार्यालयीन कामकाजादरम्यान काळी फित लावून निषेध आंदोलन करण्यात आले. महिला व बालविकास विभागाकडील राजपत्रित अधिकारी संघटना तसेच इतर सहयोगी संघटनांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सुमारे सात हजार अधिकारी व कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले होते.
या आंदोलनादरम्यान विविध संघटनांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ तसेच जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रणजीत यादव यांची भेट घेऊन सोमवारी (ता. २) निवेदन सादर केले. यामध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या मागण्या सविस्तरपणे मांडण्यात आल्या. काळी फित लावून आंदोलन करत असताना महिला व बालकांशी संबंधित अत्यावश्यक सेवांमध्ये कोणताही अडथळा निर्माण होऊ नये याची दक्षता अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घेतली. संविधानिक व शांततापूर्ण मार्गाने आपल्या मागण्या शासनापर्यंत पोहोचवण्याचा हा अभिनव प्रयत्न असून, इतक्या मोठ्या संख्येने अधिकारी-कर्मचारी सहभागी होणे ही दुर्मिळ बाब मानली जात आहे. ठाणे जिल्ह्याप्रमाणेच राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येही निवेदन देऊन काळी फित लावून कामकाज करण्याचे कार्यक्रम राबवण्यात आले. पुढील टप्प्यात आंदोलन अधिक तीव्र स्वरूपात राबवण्यात येणार असल्याचा इशारा संघटनांकडून देण्यात आला असून, शासनाने तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदन सादर करताना राजपत्रित अधिकारी संघटना, परिविक्षा अधिकारी संघटना, पर्यवेक्षिका संघटना, मुख्य सेविका संघटना, संरक्षण अधिकारी, अंगणवाडी कर्मचारी संघटना तसेच इतर कंत्राटी अधिकारी-कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
दरम्यान, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, एकात्मिक बालविकास सेवा योजना, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, मिशन शक्ती, सामर्थ्य, संबल आणि मिशन वात्सल्य यासारख्या महिला व बालकांसाठी अत्यंत महत्त्वाच्या योजनांची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अडचणींकडे वेळेत लक्ष देणे आवश्यक असल्याचे मत या वेळी व्यक्त करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT