देहरीत हरिनामाचा गजर
अखंड हरिनाम सप्ताहाने भक्तीमय वातावरण
मुरबाड, ता.३ (वार्ताहर) ः तालुक्यातील देहरी येथील श्री गुरु गोरक्षनाथ व विठ्ठल रुक्मिणी मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची रविवारी (ता. ३) भक्तिभावपूर्ण वातावरणात पार पडले. सकाळपासूनच हजारो भाविकांनी मंदिर परिसरात गर्दी केली होती.
अखंड हरिनाम सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी भाविकांनी धार्मिक विधी मोठ्या श्रद्धेने पार पाडल्याचे स्थानिक भाविक शशिकांत पांडुरंग तुपे यांनी सांगितले. त्यामुळे संपूर्ण परिसर हरिनामाच्या गजराने दुमदुमून गेला होता. सायंकाळी पारंपरिक पालखी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत काल्याचे कीर्तन व हरिनाम जागर रंगला. या दिवशी सुमारे १५ हजारांहून अधिक भाविकांनी या सोहळ्याचा लाभ घेतल्याचे चित्र दिसून आले. सप्ताह कालावधीत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. सप्ताहातील व्यवस्था व नियोजनाचे ग्रामस्थांनी कौतुक केले.
सप्ताहात दररोज पहाटे काकडा, सकाळी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी प्रवचन, सायंकाळी हरिपाठ, तर रात्री कीर्तन व जागर आणि पालखी व काल्याचे महाप्रसाद असे धार्मिक कार्यक्रम झाले. विविध मान्यवर प्रवचनकार व कीर्तनकारांनी आपल्या अमृतवाणीने भाविकांना मंत्रमुग्ध केले. एकूणच श्रद्धा, भक्ती, परंपरा व सामाजिक सलोखा यांचा सुंदर संगम साधत अखंड हरिनाम सप्ताहाचा हा सोहळा अविस्मरणीय ठरला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.