मुंबई

संजय केळकर यांचा इशारा

CD

चुकत असेल, तर त्याला जाब विचारणार
- आमदार संजय केळकर यांचा इशारा

ठाणे, ता. ३ (बातमीदार) : पाच वर्षे भ्रष्टाचारमुक्त विकास राबविण्याचा आमचा प्रयत्न असेल, परंतु कोणी त्यात चुकत असेल, तर त्याला जाब विचारल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही, असा इशारा भाजप आमदार संजय केळकर यांनी दिला आहे. मंगळवारी उपमहापौरपदी भाजपचे कृष्णा पाटील यांची निवड झाल्यानंतर त्यांना शुभेच्छा देण्यासाठी केळकर हे ठाणे महापालिकेत आले होते. या वेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी शिवसेना शिंदे गटाला अप्रत्यक्षपणे हा इशारा दिला आहे.
ठाणे महापलिका निवडणुकीत शिंदे गटाने बहुमत मिळविले असले तरी, भाजपने मुसंडी मारली आहे. अशातच महायुतीत जागा वाटपात कमी जागा मिळाल्याने, निवडणुकीच्या निकालानंतर पालिकेचे महापौरपद मिळावे यासाठी भाजपकडून दावा करण्यात आला होता. तसेच वेळ प्रसंगी विरोधी बाकावर बसण्याची तयारीदेखील भाजपने केली होती. आता शिंदेगटासोबत सत्तेत सहभागी होत, भाजपने उपमहापौर पद आपल्याकडे घेतले आहे. त्यातही निवडणुकीपूर्वी भाजपने ठाणेकरांसाठी स्वत:चा जाहीरनामा सादर केला होता. तो पूर्ण करण्याचा आता आमचा प्रयत्न असणार असल्याचेही यावेळी केळकर यांनी स्पष्ट केले. एकूणच सत्तेत राहून शिंदे सेनेच्या चुकीच्या कामांनादेखील विरोध केला जाणार असल्याचा इशाराही त्यांनी या निमित्ताने दिला आहे. तसेच पारदर्शी, भ्रष्टाचारमुक्त आणि योग्य दिशेने विकास झाला पाहिजे, तो करण्यासाठी आम्ही कट्टीबध्द आहोत. असा विश्वास भाजपचे आमदार संजय केळकर यांनी व्यक्त केला. अनधिकृत बांधकामांचा विषय हा सुरूच राहणार आहे. फेरीवाला धोरण का झाले नाही, फेरीवाल्यांची संख्या वाढत आहे, फुटपाथ, रस्ते व्यापलेले आहेत. ते मुक्त करण्यासाठी किंबहुना त्यावर सडेतोड जाब विचारला जाणार आहे.
दरम्यान, सत्तेत सहभागी होत आम्ही उपमहापौरपद घेतले आहे, परंतु इतर समितीबाबतचा निर्णय हा वरिष्ठ पातळीवर होणार असल्याची माहिती या वेळी केळकर यांनी दिली. येत्या काही दिवसांत यावर सविस्तर चर्चा केली जाईल. जे काही वाटप होईल, ते सन्मानपूर्वक झाले पाहिजे, अशी अपेक्षाही केळकर यांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: “फडणवीस चर्चेतच नव्हते… मग बोलण्याचा अधिकार कुठून?” ; बारामतीत शरद पवारांचा थेट सवाल

Stock Market Today : शेअर बाजाराची ‘चॉपी’ मोडमध्ये सुरुवात! कोणते शेअर्स वाढले?

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर रात्रभर ट्राफिक जाम, १० तासांपेक्षा जास्त वेळ प्रवासी वाटेतच; सकाळी संथगतीने वाहतूक

Latest Marathi News Live Update : महाशिवरात्रीला बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वराचं व्हीआयपी दर्शन बंद

Pimpri News : सुरक्षेच्या नावाखाली शक्तिप्रदर्शन! बाउन्सरच्या गराड्यात फिरण्याचा ट्रेंड; समाजात छाप पाडण्यासाठी खटाटोप

SCROLL FOR NEXT