मुंबई

प्रशासनापासून महापौर पदापर्यंत महिलांचे वर्चस्व

CD

उल्हासनगर महापालिकेत ‘महिलाराज’
प्रशासनापासून महापौरपदापर्यंत महिलांचे वर्चस्व
उल्हासनगर, ता. ३ (वार्ताहर) : उल्हासनगर महानगरपालिकेच्या सत्ताकेंद्रावर आता महिलांच्या नेतृत्वाची छाप उमटली आहे. प्रशासनाची सूत्रे हाताळणाऱ्या निर्णायक पदांपासून ते सर्वोच्च सत्तास्थानापर्यंत महिलांचा दबदबा दिसत असून, ‘महिलाराज’ ही संकल्पना केवळ चर्चेपुरती न राहता प्रत्यक्षात अवतरल्याचे चित्र शहराच्या कारभारात दिसून येत आहे. सत्तेपासून प्रशासनापर्यंत महत्त्वाच्या पदांची सूत्रे महिलांच्या हाती आली आहेत.
पालिकेत मंगळवारी (ता. ३) महापौरपदावर अश्विनी निकम विराजमान झाल्या आहेत. यामुळे उल्हासनगरात महिलाराज सुरू झाल्याचे म्हटले जात आहे. याशिवाय आयुक्तपदावर मनीषा आव्हाळे, तर उपायुक्तपदावर विशाखा मोटघरे कार्यरत आहेत, तर सामान्य प्रशासन विभागाच्या उपायुक्त म्हणून दीपाली चौगुले, शिक्षण विभागाच्या उपायुक्त म्हणून स्नेहा कर्पे, आरोग्य विभागात मोहिनी धर्मा, करनिर्धारक आणि संकलन अधिकारी नीलम कदम, सहाय्यक आयुक्तपदावर सलोनी नीवकर, नागरिक सुविधा केंद्राच्या प्रमुख म्हणून श्रद्धा बाविस्कर, मालमत्ता व्यवस्थापक म्हणून छाया डांगळे, समाज कल्याण विभागात संजीवनी सुतार तसेच प्रभाग क्रमांक चारच्या सहाय्यक आयुक्त म्हणून अलका पवार जबाबदारी सांभाळत आहेत.
हे सर्व विभाग पालिकेच्या दैनंदिन कारभारासाठी कणा मानले जातात. आर्थिक नियोजन, कर आकारणी, शिक्षण व्यवस्था, आरोग्यसेवा, समाजकल्याण, मालमत्ता व्यवस्थापन आणि नागरिकांशी थेट संबंधित सुविधा या सर्व क्षेत्रांमध्ये महिलांचे नेतृत्व ठळकपणे पुढे आले आहे. निर्णयक्षमता, प्रशासकीय शिस्त, कामातील संवेदनशीलता आणि पारदर्शकता यामुळे महिला अधिकाऱ्यांची कार्यपद्धती प्रशासकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.

मूलभूत सुविधांवर विशेष लक्ष
उल्हासनगरच्या नागरिकांनी आम्हाला दिलेल्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी मी संपूर्ण निष्ठेने काम करेन. चार वर्षांनंतर लोकनियुक्त नेतृत्वाला मिळालेली ही जबाबदारी केवळ पदाची नसून, शहराच्या भवितव्याची आहे. पाणी, रस्ते, स्वच्छता, आरोग्य आणि मूलभूत सुविधांवर विशेष लक्ष केंद्रित करत उल्हासनगरला विकासाच्या नव्या उंचीवर नेण्यासाठी मी अहोरात्र प्रयत्न करेन, असे नवनिर्वाचित महापौर अश्विनी निकम यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, NZ vs SA: अ‍ॅलेनच्या शतकी वादळात युवराज सिंगचाही १९ वर्षे जुना विक्रम मोडला; 'हा' पराक्रम करणारा जगातील पहिला खेळाडू ठरला

Latest Marathi News Live Update : वसई विरार महापालिकेत दोन दिवस पाणीपुरवठा राहणार बंद

Mahayuti Leaders Meeting Mumbai : कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्ष, गोकुळवर मुंबईत खलबते; महायुतीच्या नेत्यांच्या बैठकीत ठरलं! सतेज पाटील एकाकी पडणार

Donkey Breeding Scheme: आता गाढव ठरणार ‘सोन्याची खाण’! केंद्र सरकार देणार तब्बल ५० लाखांची मदत; काय आहे योजना?

Stock Market Today: 4 सत्रांच्या घसरणीला ब्रेक! शेअर बाजाराची तेजीत सुरुवात; कोणते शेअर्स वाढले?

SCROLL FOR NEXT