मुंबई

चित्रनगरीत ‘शूट अ शॉर्ट’ कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद

CD

चित्रनगरीत ‘शूट अ शॉर्ट’ कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद
राज्यभरातील ५० जण सहभागी

मुंबई, ता. ३ : दादासाहेब फाळके चित्रनगरीत आयोजित करण्यात आलेली ‘शूट अ शॉर्ट’ ही लघुपट निर्मिती प्रशिक्षण कार्यशाळा नुकतीच यशस्वीपणे पार पडली. महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या पुढाकाराने राबवण्यात आलेल्या या उपक्रमाला राज्यभरातून मोठा प्रतिसाद लाभला. महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली २९ जानेवारी ते १ फेब्रुवारी या कालावधीत ही कार्यशाळा घेण्यात आली. चार दिवस चाललेल्या या प्रशिक्षणात ज्येष्ठ चित्रपट समीक्षक समर नखाते आणि राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते दिग्दर्शक उमेश कुलकर्णी यांनी सहभागी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कथा मांडणी, दिग्दर्शन, दृश्यभाषा, लघुपट निर्मितीची प्रक्रिया आणि सिनेमाकडे पाहण्याचा दृष्टिकोन यांसारख्या विविध विषयांवर सखोल चर्चा आणि मार्गदर्शन सत्रे घेण्यात आली. कार्यशाळेत केवळ मुंबईतीलच नव्हे, तर अकोला, पुणे, नागपूर आणि अमरावती यांसारख्या जिल्ह्यांमधून एकूण ५० जण सहभागी झाले होते. चित्रपट आणि मनोरंजन क्षेत्राशी संबंधित प्रशिक्षण उपक्रमाच्या दृष्टीने दादासाहेब फाळके चित्रनगरीत आयोजित करण्यात आलेला हा पहिलाच प्रयत्न असून, तो यशस्वी ठरला आहे. कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी महामंडळाचे सह व्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर यांनी भविष्यात अधिकाधिक तांत्रिक कौशल्याधारित कार्यशाळा आणि उपक्रम राबविण्याचा मानस असल्याचे सांगितले.

फोटो - 556

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar last call Shrijit Pawar : विमान अपघातापूर्वी अजित दादांनी शेवटचा कॉल केलेले श्रीजीत पवार कोण?

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरील वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांच्या संतापाचा उद्रेक, टोल वसूल करताय पण सुविधा देणार कोण?

Latest Marathi News Live Update : लोकसभेचं कामकाज आजही विस्कळीत

IT Stock Crash : अमेरिकन कंपनीच्या भीतीने TCS, Infosys सोबत या IT कंपन्यांचे शेअर्स कोसळले! काय आहे कारण?

Content Creator Labs : कॉलेजमध्ये शिकता-शिकता करा लाखोंची कमाई! मिळणार 'क्रिएटर' बनण्याचे सर्टिफिकेट, Netflix अन् Google स्वतः देईल जॉब

SCROLL FOR NEXT