तीन विकसकांना
म्हाडाकडून दीडशे कोटी
पत्राचाळ प्रकल्पाची नुकसानभरपाई
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ : गोरेगाव पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पात गैरव्यवहार झाल्याने राज्य सरकारने २०१९ मध्ये हा प्रकल्प खासगी विकसकांकडून काढून घेतानाच म्हाडाच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार म्हाडाने ६०० रहिवाशांसह लाॅटरीधारकांना घरे देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. प्रकल्प काढून घेतलेल्या संबंधित तीन विकसकांना म्हाडाने उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार भरपाईपोटी तब्बल १५३ कोटी रुपये दिले आहेत. त्यामध्ये सुमारे ७६ कोटी रुपये मूळ रक्कम आणि ७७ कोटी रुपयांच्या व्याजाचा समावेश आहे.
पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्प सुरुवातीला गुरू आशीष या विकसकाकडून राबवला जाणार होता. त्यानुसार येथील मूळ रहिवाशांना आणि म्हाडाला देय असलेली घरे प्राधान्याने बांधणे अवश्यक होते; मात्र या विकसकाने विक्रीयोग्य घरे बांधतानाच प्रकल्पाचा काही भाग वेगवगेळ्या तीन विकसकांना विकला होता. त्यामुळे पत्राचाळीतील मूळ रहिवाशांची घरे कोण बांधणार, असा प्रश्न उपस्थित झाला होता. त्याची दखल घेत राज्य सरकारने हा प्रकल्प विकसकांकडून काढून घेत म्हाडाच्या माध्यमातून पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार म्हाडाने मूळ रहिवासी आणि लाॅटरीधारकांच्या घराची कामे पूर्ण केली आहेत. दरम्यान, फिस्ट इन्फ्रा, गोल्ड फिंगर रिअल्टी आणि भूमी शास्वत या तीन कंपन्यांनी नुकसानभरपाईसाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानुसार न्यायालयाने १५३ कोटी रुपये भरपाई देण्याचे निर्देश दिले असता, म्हाडाने ही रक्कम नुकतीच चुकती केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
---
कोणाला किती भरपाई?
फिस्ट इन्फ्रा - २४.१६ कोटी
गोल्ड फिंगर रिअल्टी - ४४ कोटी
भूमी शास्वत - ८४.३२ कोटी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.