संघाच्या शताब्दीनिमित्त
सरसंघचालकांचा संवाद
७, ८ फेब्रुवारीला वरळीत कार्यक्रम
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ ः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त वरळीच्या नेहरू सेंटरमध्ये ७ आणि ८ फेब्रुवारीला दोनदिवसीय कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. या वेळी सरसंघचालक मोहन भागवत विविध क्षेत्रांतील मान्यवरांशी संवाद साधणार असल्याची माहिती माहिती संघाचे अखिल भारतीय प्रचारप्रमुख सुनील आंबेकर यांनी आज येथे एका पत्रकार परिषदेत दिली.
७ फेब्रुवारीला पहिल्या दिवशी दोन सत्रांत मोहन भागवत यांचे व्याख्यान होईल, तर दुसऱ्या दिवशी सकाळी सरसंघचालक भागवत हे श्रोत्यांच्या प्रश्नांना उत्तरे देतील. आर्थिक, न्यायिक, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, क्रीडा, कला, चित्रपटसृष्टी, रहिवासी संघ अशा विविध क्षेत्रांतील ८००-९०० मान्यवरांशी ते संवाद साधणार आहे. गेल्या १०० वर्षांतील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची वाटचाल, संघाचा विचार, महत्त्वपूर्ण टप्पे, आगामी योजना याबाबत भागवत आपले विचार मांडतील. तसेच भविष्यात संघाच्या कार्यात लोकांचा सहभाग वाढवा, यादृष्टीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचेही आंबेकर यांनी सांगितले.
संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त देशभरात व्याख्यानमालेचे आयोजन केले होते. यापूर्वी दिल्ली, बंगळूर, कोलकात्यात आयोजन करण्यात आले होते, आता मुंबईत समारोपीय व्याख्यानमाला असणार आहे. यानिमित्त समाजातील विविध घटकांना जोडण्यासाठी गृह संपर्क, हिंदू संमेलन, प्रबुद्ध गोष्टी संमेलने, सद्भाव बैठक आणि युवा संमेलन यांसह अनेक प्रेरणादायी कार्यक्रमांची रचना करण्यात आल्याचेही आंबेकर यांनी सांगितले. या वेळी कोकण प्रांत संघचालक अर्जुन चांदेकरदेखील उपस्थित होते.
---
विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा सहभाग
गेले चार महिने या कार्यक्रमाची तयारी सुरू आहे. विविध १० श्रेणी तयार करून त्या-त्या क्षेत्रातील मान्यवरांशी संपर्क साधला गेला. यामध्ये आशा भोसले, हृदयनाथ मंगेशकर, बोनी कपूर, चिराग शेट्टी, लेखक विश्वास पाटील, चिन्मय मिशनसह कला, साहित्य, चित्रपट, क्रीडा, संत परंपरेतील लोक या वेळी उपस्थित राहणार असल्याचे आंबेकर यांनी स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.