मुंबई

नेता तोच, ‘ज्यांचं काम बोलतं’

CD

नेता तोच, ‘ज्यांचं काम बोलतं’
--------
विराज मुळ्ये
-----------
श्रीकांत एकनाथ शिंदे हे असे नेते आहेत, जे बोलतात कमी आणि काम अधिक करतात. जे इतरांवर टीका करण्यात वेळ, श्रम वाया घालवत नाहीत; पण राजकीय आणि राज्याच्या पटलावर त्यांचे काम मात्र तितक्याच प्रभावीपणे बोलते.
--------------

राजकारणात कर्तृत्ववान नेत्यांची काही कमतरता नाही. महाराष्ट्राला कर्तृत्ववान नेत्यांची मोठी परंपरा आहे; मात्र या कर्तृत्वाने त्यांची पुढची पिढी तितकीच कर्तृत्ववान असेल, हे सांगता येत नाही. याला काही अपवादही आहेत, त्यातील एक म्हणजे शिवसेनेचा युवा चेहरा, आश्वासक नेतृत्व, कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे. वडील एकनाथ शिंदे यांच्या कर्तृत्वाची चमक, त्यांच्या कामाचा झपाटा, त्यांचे व्हिजन हे जसेच्या तसे श्रीकांत शिंदे यांच्यात उतरल्याचे अनेकदा दिसून येते.
श्रीकांत शिंदे हे एम.एस. ऑर्थो असून, डॉक्टर आहेत. शिक्षणानंतर शासकीय रुग्णालयात काही काळ सेवासुद्धा दिली. शिवसेना पक्षाला ज्या वेळेस एका तरुण उमेदवाराची गरज होती, त्या वेळी श्रीकांत शिंदे यांना पुढे यावे लागले. कल्याण लोकसभा मतदारसंघात त्यांना निवडणूक लढावी लागली; पण निवडणूक लढवून जिंकण्यापुरते श्रीकांत शिंदे मर्यादित राहिले नाहीत. मतदारसंघात विशेष लक्ष देत त्यांनी अनेक पायाभूत सुविधा उभारल्या. अनेक महत्त्वाचे प्रकल्प मार्गी लावले. रेल्वे, रस्ते, उड्डाणपूल यांसारख्या अनेक गोष्टी ज्या पूर्ण होण्यासाठी वर्षानुवर्षे लागतात, ते त्यांनी अल्पकाळात पूर्ण केले. इतकेच नव्हे तर दाखवता येतील, सांगता येतील आणि लोक स्वतः सांगतील, अशी अनेक कामे त्यांनी आपल्या कल्याण लोकसभा मतदारसंघात उभी केली.
२०२० मध्ये महाराष्ट्राने मोठी राजकीय उलथापालथ पाहिली. शिवसेना या पक्षात विचारांवरून मोठी दुफळी दिसून आली. एकनाथ शिंदे आपल्या सहकाऱ्यांसह सुरतमार्गे गुवाहाटी येथे गेले. तिथून ते गोवा येथे आले आणि त्यांनी महाराष्ट्रात मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारला. या सर्व परिस्थितीत एकनाथ शिंदे यांच्या मुत्सद्दीपणासोबत कार्यकर्ते आणि नेते यांच्याशी संवाद देशाने पाहिला. या सर्वांत न दिसलेली; मात्र घडत असलेली प्रत्यक्ष कृती ही खासदार श्रीकांत शिंदे यांची होती. राज्यात एकीकडे एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेला पाठिंबा मिळत होता; मात्र काही ठिकाणी आमदारांचे, खासदारांचे नातलग, मित्र, सहकारी आणि कार्यकर्ते भीतीच्या छायेत होते. त्यांच्याशी संवाद साधण्याचे, विश्वास आणि दिलासा देण्याचे महत्त्वाचे काम श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून करण्यात आले.
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर त्यांच्या ठाणे येथील निवासस्थानाबाहेर श्रीकांत शिंदे यांनी एका कारवर उभे राहून केलेले भाषण तितकेच आश्वासक आणि विश्वास वाढवणारे होते. त्या एका भाषणानंतर श्रीकांत शिंदे यांनी पुन्हा मागे वळून पाहिले नाही. आपला मतदारसंघ हा फक्त कल्याण नाही तर संपूर्ण महाराष्ट्र आहे. शिवसैनिकाचा कोणताही मतदारसंघ नसतो, तो ज्या भागात जातो तो त्याचा मतदारसंघ होतो, या विचारांवर श्रीकांत शिंदे यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. मुंबई महापालिका क्षेत्रात ठिकठिकाणी शाखांना भेटी देणे असो, येथील महत्त्वाच्या मुद्द्यांना प्रशासनापर्यंत पोहोचवणे असो किंवा संघटनात्मक बांधणीत युवकांना बळ देणे असो, या प्रत्येक पायरीवर श्रीकांत शिंदे उजवे ठरले.
विधानसभा निवडणुकांमध्ये स्वतःच्या मतदारसंघापुरता मर्यादित न राहता श्रीकांत शिंदे यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. असे काही मतदारसंघ आहेत जिथे शिवसेनेचा आमदार निवडून येईल, याची बिलकुल शास्वती नव्हती; मात्र असे काही मतदारसंघ अनपेक्षितरीत्या शिवसेनेच्या ताब्यात गेले. यात श्रीकांत शिंदे यांचाही मोलाचा वाटा आहे.
कार्यकर्त्याला बळ देणे, संघटनात्मक फळी उभी करणे, नेत्याच्या अनुपस्थितही पक्ष तितकाच ताकदीने सुरू राहील आणि वाढत राहील, यासाठी रचना करणे, अशी कामे श्रीकांत शिंदे यांनी शिवसैनिक म्हणून केली. नव्या चेहऱ्यांना संधी देणे, जुन्या पदाधिकारी आणि नेत्यांचा योग्य सन्मान राखणे, दोन फळ्यांमध्ये समन्वय साधने, पक्षात उच्चशिक्षितांचा योग्य समतोल ठेवणे आणि पक्षाची विचारधारा अबाधित राखण्याचे काम श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून झाले आहे. पक्षाचे विविध महापालिकांमध्ये निवडून आलेले नगरसेवक, विराजमान झालेले महापौर, त्यात महिलांना दिलेली संधी, त्या मतदारसंघांमध्ये महापालिकांमध्ये झालेली विकासकामे आणि दिसत असलेला विकास, हाच आता बोलू लागला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harish Rana Case: हरिश राणाच्या इच्छामरणासाठी १३ वर्षे का लागली? कायदा, कोर्ट आणि वेदनेची पूर्ण कहाणी; ही पहिलीच केस नाही तर…

UPSC Fake Rank Case : युपीएससी उत्तीर्ण तरुणाचा आमदार अन् पोलिसांनी केला सत्कार; सत्य समजताच सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकली

Indian Women Hockey: पात्रता मिळवली, आता लक्ष्य विजेतेपदाचे; भारतीय महिला हॉकी संघाचा आज इटलीविरुद्ध उपांत्य सामना

Viral Video: व्हायरल होण्यासाठी वादग्रस्त कृत्य! चेंबूरमध्ये आगरी-कोळी परंपरेचा अपमान, व्हिडिओनंतर उसळला संताप

'मी तिला किस करणार नाही' संजय दत्तने 'या' अभिनेत्रीसोबत किसिंग सीन करण्यास दिलेला नकार, म्हणालेला...'तिला मी...'

SCROLL FOR NEXT